ट्रम्प शपथविधीनंतर जयशंकर ऍक्शन मोड मध्ये

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 17 h ago
ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत जयशंकर यांची महत्त्वपूर्ण बैठक
ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत जयशंकर यांची महत्त्वपूर्ण बैठक

 

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी १९ जानेवारी २०२५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत क्वाड गटातील सहकार्य, द्विपक्षीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली.  

जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वाँग यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत सांगितले,“वॉशिंग्टन डीसीमध्ये क्वाडच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करताना आनंद झाला. जगातील स्थितीवर नेहमीच रोचक चर्चा होते.” 
 
 
त्यानंतर जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांच्यासोबतही जयशंकर यांनी चर्चा केली. या चर्चेचा उल्लेख करत जयशंकर म्हणाले, “जपानचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया यांच्यासोबत द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि क्वाडशी संबंधित घडामोडींवर चर्चा केली.”  

अमेरिकेतील नव्या प्रशासनाशी भारताचे संबंध दृढ करण्यावर भर  
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेचे नवे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारत-अमेरिका संबंध आणखी पुढे नेण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती आहे. रुबियो यांनी परराष्ट्र सचिव पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांतच जयशंकर यांच्यासोबत बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  

 
ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी जयशंकर अमेरिकेत 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेत दाखल झाले होते.एस.जयशंकर हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ४७व्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीसाठी भारतीय सरकारचे प्रतिनिधित्व करत होते. ट्रम्प-व्हन्स उद्घाटन समितीच्या आमंत्रणावरून ते या समारंभाला उपस्थित . या भेटीदरम्यान त्यांनी नव्या प्रशासनातील महत्त्वाच्या व्यक्तींशी आणि अन्य मान्यवरांसोबतही चर्चा केली.

भारत-अमेरिका संबंधांमध्ये नवीन पाऊल – लॉस एंजेलिसमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास 
या दौऱ्याच्या काही दिवस आधी,जयशंकर यांनी अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेट्टी यांच्या उपस्थितीत बंगळुरूतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान जयशंकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली की, भारत लवकरच लॉस एंजेलिसमध्ये नवीन वाणिज्य दूतावास सुरू करणार आहे.

जयशंकर म्हणाले,"भारत-अमेरिका संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या नवीन वाणिज्य दूतावासामुळे दोन्ही देशांतील व्यापारी, सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध अधिक मजबूत होतील."  

चीनच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत अमेरिकेच्या उपाध्यक्षांची चर्चा
अमेरिकेचे उपाध्यक्ष-निर्वाचित JD वांस यांनी चीनचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान फेंटानिल व्यापार, द्विपक्षीय व्यापार संतुलन आणि प्रादेशिक स्थिरतेसंबंधी चर्चा करण्यात आली.  

क्वाडच्या भूमिकेवर ट्रम्प प्रशासनाचा भर 
२०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात स्थापन झालेला क्वाड गट अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा एकत्रित मंच आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही या गटाला महत्त्व देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी सर्व क्वाड परराष्ट्र मंत्री वॉशिंग्टन डीसीमध्ये उपस्थित असल्याने, या मंचाच्या भविष्यातील दिशा ठरव