भारतपोल पोर्टलचे अनावरण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सीबीआयचे संचालक प्रवीण सूद, सहायक संचालक मनोज शशिधर आदी.
सायबर, आर्थिक आणि संघटित गुन्हे, मानव तस्करी तसेच आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांच्या तपासात वेग आणण्याच्या उद्देशाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने भारतपोल पोर्टलची सुरुवात केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मंगळवारी या पोर्टलची सुरुवात करण्यात आली. राज्य पोलिसांना गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोर्टलच्या माध्यमातून इंटरपोलची मदत घेता येणार असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे.
भारतपोल पोर्टलचा भारतीय उपास संस्थांनाच नव्हे तर परदेशातील तपास संस्थांना देखील लाभ होणार आहे. परकी संस्था या पोर्टलच्या माध्यमातून एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी भारतीय तपास संस्थांशी संपर्क साधू शकतात. आंतरराष्ट्रीय तपासाच्या अनुषंगाने सध्या अनेक स्तरावर अडथळे येतात. भारतपोल पोर्टलमुळे हे अडथळे बऱ्याच प्रमाणात कमी होतोल, असा विश्वास गृहमंत्री शहा यांनी पोर्टलच्या उद्घाटनानंतर व्यक्त केला. इंटरपोलच्या सहकार्याने आत्तापर्यंत एकच संस्था काम करू शकत होती. तथापि नव्या पोर्टलमुळे देशातील प्रत्येक तपास संस्था आणि विविध राज्यांची पोलिस काम करू शकेल.
कनेक्ट, नोटीस, संदर्भ, ब्रॉडकास्ट आणि रिसोर्स हे भारतपोल पोर्टलचे पाच प्रमुख मॉड्यूल राहणार आहेत. या माध्यमातून देशातील सर्व तपास संस्था एका प्लॅटफॉर्मवर येतील, असे शहा यांनी नमूद केले. भारतपोल पोर्टल हे एक मजबूत तांत्रिक प्लॅटफॉर्म बनेल, असा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, पोर्टलमुळे इतर देशांतील तपास संस्थांना पुरावे आणि संदर्भ अधिक वेगाने पाठवणे आणि त्यांच्याकडून तत्काळ इनपुट घेणे सुलभ होणार आहे. गुन्हे केल्यानंतर अनेक गुन्हेगार तपास संस्थांच्या नजरेआड होतात. मात्र नयी व्यवस्था लागू करण्यात आल्यामुळे देशाबाहेर पळालेल्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचवणे सोपे जाईल. भारतपोल पोर्टलचा चांगल्या पद्धतीने उपयोग व्हावा, यासाठी सीबीआयने सर्व संबंधितांना सम्य प्रशिक्षण द्यावे, असेही शहा यांनी नमूद केले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter