सुफी संतांचे योगदान प्रेरणादायी - कवयित्री शेख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
लातूरच्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनातील क्षण
लातूरच्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनातील क्षण

 

सामाजिक ऐक्याच्या जडणघडणीत सूफी संतांचे योगदान आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. हीच परंपरा चालविण्याचे कार्यसर्व मुस्लिम मराठीसाहित्यिक करीत आहेत, असे प्रतिपादन फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, कवयित्री मलेका महेबुब शेख-सय्यद यांनी रविवारी (ता. १२) येथे केले.

ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेतर्फे तिसऱ्याराज्यस्तरीय फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत नागोराव कुंभार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मोईजभाई शेख, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, कवी फ. म. शहाजिंदे, प्राचार्य इ. जा. तांबोळी, अय्यूब नल्लामंदू, हाशम पटेल, प्रा. मैनोदिन मुल्ला, कवी शेख शफी बोल्डेकर, माजी संमेलनाध्यक्षा कवयित्री अनिसा सिकंदर शेख, कवी खाजाभाई वागवान, अफसर शेख आदी उपस्थित होते. याप्रसंगी 'स्पंदन' या स्मरणिकेसह मलेका शेख लिखति 'अक्षर अक्षर शिकूया' या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.

कुंभार म्हणाले, सहिष्णुता हे शाश्वत मूल्य असून, या मूल्याची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. प्राचार्य तांबोळी म्हणाले, फातिमाबी यांना काल्पनिक पात्र म्हटले जाते, हे चुकीचे आहे. शासनाच्या अनेक पुस्तकांत फातिमाबी यांची नोंद सापडते. 

परिसंवाद, कविसंमेलन, पुरस्कार वितरण 
उ‌द्घाटन सत्रानंतर 'वर्तमानातील मुस्लिम मराठी साहित्याची भूमिका' या विषयावर डॉ. जयद्रथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यात रामराजे आत्राम, नसीम जमादार, मुतवल्ली मैजोडिन, एम. नौशाद उस्मान यांनी विचार मांडले. त्यानंतर पुणे येथील कवी बा. है. मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. संमेलनात कवयित्री नूरजहाँ शेख यांना सिकंदर शेख यांच्या स्मरणार्थ युगस्त्रों फातिमाको शेख समाजसेवा पुरस्कार आणि गौसपाशा शेख यांना हुसेनसाव बागवान यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आली.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter