संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारत अग्रदूत

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 18 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताने युनायटेड नेशन्स (युएन) शांतता राखणाऱ्या मोहिमांमध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले की, "भारत परराष्ट्र धोरण संवाद, कूटनीती आणि सहकार्याद्वारे शांतता राखण्यासाठी प्राधान्य देते. 'वसुंधैव कुटुंबकम' या तत्त्वावर विश्वास ठेवणारा भारत युएन शांतता मोहिमांमध्ये योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे."

युएन शांतता मोहिमेचा उद्देश जागतिक सुरक्षा राखणे, राजकीय प्रक्रिया सुलभ करणे, नागरिकांचे संरक्षण करणे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करणे आहे. युएन शांतता राखण्यामध्ये भारताच्या योगदान हे केवळ जवान पाठवण्याापुरते मर्यादित नाही तर, भारताचे तत्त्वज्ञान शांतता राखण्यासाठी, समन्वय आणि जागतिक समुदायातील एकजूट राखण्यासाठी आहे . शांतता राखणारी धोरणे ही भारतीय सैन्याच्या शांतिकारक तत्त्वज्ञानामुळे संपूर्ण जगाला एक आदर्श निर्माण करून देणारी आहे. 

भारताची भागीदारी
भारताने १९५३मध्ये कोरियाच्या युद्धात युएन शांतता मोहिमेसाठी आपले पहिले योगदान दिले होते. त्यानंतर आजपर्यंत ५० हून अधिक मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. २९०,००० हून अधिक भारतीय जवान जगभरातील विविध मोहिमांमध्ये सेवा देत आहेत. सध्या ५००० हून अधिक भारतीय जवाना ९ सक्रिय मोहिमांमध्ये कार्यरत आहेत. या मोहिमांमध्ये लेबनॉन, दक्षिण सूडान, कांगो, साइप्रस आणि गोलन हाइट्स यांसारख्या देशांचा समावेश आहे.
 

भारताचे जवान विविध प्रकारच्या युनिट्समध्ये कार्यरत आहेत. मग त्यामध्ये पायदल दल, वैद्यकीय युनिट्स, अभियंता कोंटिंगेंट, लष्करी निरीक्षक आणि पोलिस युनिट्स यांचा समावेश आहे. याच्या धैर्यपूर्ण सेवेमुळे भारतीय जवानांनी जागतिक स्तरावर गौरव मिळाला आहे. २०२३ मध्ये युएनने कांगोमध्ये आपले प्राण अर्पण करणाऱ्या भारतीय जवानांना डॅग हॅमर्स्कजोल्ड पदकाने सन्मानित केले होते.

महिलांचा समावेश
भारताने युएन शांतता मोहिमांमध्ये महिलांच्या सहभागासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २००७ मध्ये भारताने लिबेरियामध्ये सर्व महिलांच्या पोलिस युनिटचा समावेश केला आणि यानंतर महिलांचा त्यामध्ये सहभाग वाढला. आज १५० हून अधिक भारतीय महिला जवान  कांगो, दक्षिण सूडान, लेबनॉन आणि इतर संघर्षग्रस्त भागांत कार्यरत आहेत.

महिला जवानांचे योगदान  युएनने जागतिक स्तरावर मान्यता दिली आहे. मेजर राधिका सेन यांना २०२३ मध्ये 'मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर' म्हणून सन्मानित करण्यात आले, त्याच्या कार्यामुळे महिला आणि मुलींच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कारण त्या स्थानिक समुदायांशी संवाद साधू शकतात आणि जेंडर आधारित हिंसा रोखण्यास मदत करू शकतात.
 

तंत्रज्ञानाचा वापर
भारताने शांतिकारक मोहिमांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.  शांतिकार्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी, भारताने स्वदेशी बनवलेली उपकरणे आणि तंत्रज्ञान मोहिमांमध्ये वापरणे सुरू केले आहे. यामुळे शांतिकार्यांमध्ये सुधारणा झाली असून, सैनिकांना विविध परिस्थितीमध्ये कार्य करणे सोपे झाले आहे.

भारताचे युएन शांतता मोहिमांमध्ये योगदान केवळ सैनिकांची भागीदारी नाही, तर शांतिकार्यांमध्ये महिलांचा समावेश, तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व आणि प्रशिक्षित सैनिकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भारताने जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका बजावली आहे आणि युएन शांतिकार्यांसाठी एक आदर्श बनला आहे.

शांततेचा संदेश
भारताच्या या योगदानामुळे आंतरराष्ट्रीय शांतिकार्यांच्या प्रक्रियेतील भारताचे स्थान अजूनही मजबूत होत आहे. भारताच्या जवानांची निष्ठा, धैर्य आणि समर्पण शांतिकार्याच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. तसेच भारताच्या नेतृत्वाखाली शांतिकारक कार्य अधिक प्रभावी होऊ शकते. भारताच्या या योगदानामुळे शांततेचा संदेश जगभरात पोहोचला आहे.