पंतप्रधान मोदींसह मान्यवरांनी दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्दशीस महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी शिव व पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता, अशी पौराणिक मान्यता आहे. यंदा महाशिवरात्री आज २६ फेब्रुवारीला साजरी केली जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर नेत्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.  

पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना लोकांच्या समृद्ध आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, "मी माझ्या सर्व देशवासियांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हा दिव्य प्रसंग तुम्हा सर्वांना आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो आणि विकसित भारताचा संकल्प बळकट करो. हर हर महादेव!" 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व नागरिकांवर महादेवाची कृपा राहो अशी प्रार्थना केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देते. परमेश्वर महादेवाचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहोत आणि आपला देश प्रगतीपथावर वाटचाल करत राहो अशी मी प्रार्थना करते." 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही  देशवासीयांना महाशिवरात्रीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. "महाशिवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. शिव आणि शक्तीच्या मिलनाचा हा सण अध्यात्म, आत्मनिरीक्षण आणि श्रद्धेचा एक महान सण आहे. मी देवाधिदेव महादेव यांना सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो."

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागरिकांच्या आनंद, समृद्धी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "महाशिवरात्रीच्या पवित्र सणाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! महादेव तुम्हा सर्वांच्या जीवनात  निरोगी आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो. जय भोलेनाथ!

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी महाशिवरात्रीनिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी हा दिवस त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप खास असल्याचे सांगितले आहे. त्यांचा जन्म महाशिवरात्रीच्या दिवशी झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. "मी महाशिवरात्रीच्या दिवशी जन्मलो. माझे नाव शशी हे शंकराच्या कपाळावरील चंद्रकोरीवरून ठेवण्यात आले. केरळ दिनदर्शिकेनुसार आज माझा 'नक्षत्र वाढदिवस' आहे. हा दिवस माझ्या कुटुंबासाठी नेहमीच खूप खास राहिला आहे, ॐ नमः शिवाय!" 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा! दैवी शक्ती आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो!"