आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरच्या महिन्यात अर्थात मार्च महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) १.९६ लाख कोटी रुपयांचा करमहसूल प्राप्त झाला आहे. हे वर्षातील दुसरे सर्वाधिक जीएसटी संकलन आहे. गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत त्यात १०९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२४ मध्ये १.७६ लाख कोटी रुपये करसंकलन झाले होते. फेब्रुवारी महिन्यात १.८३ लाख कोटी रुपये करसंकलन झाले होते. सरकारने ही आकडेवारी जाहीर केली.
मार्चमध्ये देशांतर्गत जीएसटी संकलन १.४९ लाख कोटी रुपये असून, आयातीतून मिळणाऱ्या जीएसटीमध्ये सर्वाधिक १३.५६ टक्क्यांनी वाढ होऊन ४६,९१९ रुपये कर जमा झाला आहे. एकूण केंद्रीय जीएसटी संकलन ३८,१०० कोटी रुपये, तर राज्य जीएसटी संकलन ४९,९०० कोटी रुपये झाले आहे. मार्चमध्ये एकात्मिक जीएसटी संकलन ९५,९०० कोटी रुपये, तर उपकर संकलन ९२,३०० कोटी रुपये झाले आहे. त्यात वार्षिक ७.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
वाढ जीएसटी संकलनात दरमहा स्थिर दिसून आली आहे कारण वार्षिक एकूण जीएसटी संकलनात ९.४ टक्के वाढ दिसून येते. प्रमुख उत्पादक मार्च महिन्यात जीएसटी परताव्याचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढून १९,६१५ कोटी रुपयांवर गेले आहे. परतावे दिल्यानंतर मिळालेला जीएसटी महसूल १.७६ लाख कोटी आणि ग्राहक राज्यांमध्ये जीएसटी संकलनाच्या वाढीच्या दरांमध्ये अजूनही मोठी तफावत आहे.
महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान यांसारख्या राज्यांनी १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दर्शविली आहे, तर गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी राज्यांनी एक टक्के ते साच टक्क्यांच्या श्रेणीत वाढ दर्शविली आहे. जी मार्च महिन्यासाठी खूपच कमी आहे. या राज्यांमधील क्षेत्रीय वाढ आगि दरांचे मूल्यांकन करून याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे, असे डेलॉइंट इंडियाचे भागीदार एम.एस. मणी यांनी सांगितले.
प्रवासी वाहने महागली
खर्चामुळे देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या बहुतांश मोटारीच्या किमती एक एप्रिलपासून वाढवल्या आहेत. मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, गुंदाई, टाटा मोटर्स यांनी आधीच किंमतवाढीची घोषणा केली होती. आता किआ इंडिया, होंडा कार्स इंडिया, रेनॉल्ट इंडिया आणि बीएमडब्ल्यू यांनीही या महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
आर्थिक वर्ष २०२५मध्ये २२.०८ लाख कोटी जीएसटी
आर्थिक वर्ष २०२५ साठी एकूण जीएसटी संकलन २२.०८ लाख कोटी रुपये झाले असून त्यात वार्षिक ९.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परतावा दिल्यानंतर आर्थिक वर्ष २०२५ साठी निव्वळ जीएसटी संकलन १९.५६ लाख कोटी रुपये झाले, त्यातील वार्षिक वाढ ८.६ टक्के आहे. अर्थसंकल्पात, सरकारने या आर्थिक वर्षासाठी जीएसटी महसुलात ११ टक्क्यांनी वाढ होऊन ११.७८ लाख कोटी रुपये मिळण्याचा अंदाज वर्तवला होता.