आणीबाणी १९७५ : ५० वर्षांपूर्वी 'असा' झाला होता लोकशाहीवर हल्ला

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 13 d ago
इंदिरा गांधी
इंदिरा गांधी

 

भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर केल्याच्या घटनेला आज २५ जून रोजी ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. लोकशाहीवरचा हा हल्ला, या घटनेच्या कडवट आठवणी देशवासीय अजूनही विसरलेले नाहीत. या रंजक घटनेतील महत्वाच्या पाच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. 
 
आणीबाणी विषयी 
भारताच्या इतिहासातील १९७५-७७ हा जवळपास २१ महिन्यांचा काल देशातील जनतेसाठी मोठा कसोटीचा होता. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून तत्कालीन राष्ट्रपति फखरुद्दीन अली अहमद यांची स्वाक्षरी घेऊन देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. इंदिरा गांधी यांनी लोकशाही स्थगित करत प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले आणि निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या.

मध्यरात्र आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी 
जयप्रकाश नारायण उर्फ जेपी यांच्या संपूर्ण क्रांतीच्या अवघ्या देश ढवळून निघाला होता. आजाच्याच दिवशी ५० वर्षांपूर्वी दुपारी जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात दिल्लीत रामलीला मैदानात लाखों नागरिकांच्या उपस्थितीत सभा घेतली.

महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले होते. लोकांच्या मनात संतापाची लाट उसळत होती. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला याची माहिती न देता २५ जून १९७५ रोजी मध्यरात्री घटनेच्या कलम ३५२ चा वापर करून आणीबाणी जाहीर केली. विशेष म्हणजे मध्यरात्री यासाठी राष्ट्रपती फखरुद्दीन यांची स्वाक्षरी घेण्यात आली.  
 
लाखो नागरिकांची नसबंदी 
आणीबाणीच्या काळातील नसबंदी हा अतिशय वादग्रस्त मुद्दा मानला जातो. ज्यामध्ये ५०  लाखांहून अधिक लोक बळी पडले. सरकारने आणीबाणी  जाहीर केली त्याला वरचढ नसबंधी मोहीम राबवली. इंदिरा गांधी यांनी जरी या मोहिमेची घोषणा केली तरी ही मोहिम राबावण्याची जबाबदारी मात्र संजय गांधी याच्यावर सोपवण्यात आली होती. देशातील आणीबाणीमुळे सरकारला कोणतेही धोरण राबविण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. 

आणीबाणी उठली
१८ जानेवारी १९७७ रोजी, गांधींनी नवीन निवडणुकांची घोषणा करत सर्व राजकीय कैद्यांची सुटका केली आणि आणीबाणी अधिकृतपणे २३ मार्च १९७७ रोजी संपली. विरोधी जनता चळवळीच्या मोहिमेने भारतीयांना इशारा दिला की निवडणुका 'लोकशाही आणि हुकूमशाही यापैकी एक निवडण्याची त्यांची शेवटची संधी असू शकते.'

आणीबाणीचा काँग्रसला धक्का  
मार्चमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत, इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यासह विविध राज्यांमधील काँग्रेसच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेस पक्षातील अनेक निष्ठावंतांनी इंदिरा गांधींची साथ सोडली.

त्या निवडणुकीत जनता पक्षाने २९८ जागा तर त्यांच्या मित्रपक्षांनी ४७ जागा जिंकल्या आणि मोरारजी देसाई हे भारताचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले.

आणीबाणीला समर्थन देणारी महत्त्वाची मंडळी  

बाळासाहेब ठाकरे 
महाराष्ट्रातील आणि देशातील मराठी माणसासाठी लढणारे दिग्गज नेते आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कॉंग्रेसला सदैव विरोध केला. परंतु इंदिरा सरकारच्या आणीबाणीच्या निर्णयाचे उघडपणे समर्थन करत त्यांनी अनेकांना आश्चर्यचा धक्का दिला होता.

आणीबाणीसाठी समर्थन दिल्यामुळे १९७८च्या महाराष्ट्र विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा मोठा पराभव झाला होता. 

विनोबा भावे 
इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये बाळासाहेब ठाकरेंनंतर विनोबा भावे हे एक खूप मोठे नाव होते. भावे हे स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध गांधीवादी होते. अनेकजन त्यांना महात्मा गांधींचे आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणायचे.
गांधीवादी असूनही त्यांनी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

जेआरडी टाटा
इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये उद्योगपती जेआरडी टाटा, हे आणखी एक मोठे नाव होते. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत टाटा यांनी आणीबाणी लागू केल्याबद्दल इंदिरा गांधींना दिलेल्या पाठिंब्याचे समर्थन केले होते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter