पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात अविस्मरणीय काम केलं आहे. गेल्या १० वर्षात ४० कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केलं. कठीण परिस्थितीत काम करणारे मोदी कनखर नेते आहेत, अशी स्तुती जेपी मॉर्गनचे सीईओच जेमी डीमन यांनी केली आहे. न्युयॉर्कमध्ये इकॉनॉमिक क्लबने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
अग्रगण्य बँकरने पंतप्रधान मोदींना देशातील कालबाह्य नोकरशाही व्यवस्था मोडीत काढल्यामुळे कठोर प्रशासक म्हणून संबोधलं आहे. मात्र आम्हाला इथे (अमेरिकेत) थोडं अधिक हवं आहे. जागतिक बँकिंग दिग्गज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, देशात विश्वसनीय शिक्षण प्रणाली आणि अविश्वसनीय पायाभूत सुविधा आहेत.डिमन यांनी देशाच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीची प्रशंसा केली ज्याने विविध राज्यांमधील कर प्रणालीतील असमानता दूर करून भ्रष्टाचार दूर केला आहे.
भारतात 29 राज्ये किंवा आहेत, मात्र त्यांची स्वतंत्र करप्रणाली होती. जवळजवळ युरोपसारखंच ज्यात पूर्णपणे भिन्न करप्रणाली आहे, ज्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार होतो. त्या सर्व करप्रणाली त्यांनी मोडीत काढल्या. प्रत्येक नागरिकाला डोळ्यांच स्कॅनिंग किंवा हातच्या ठशांनी ओळखलं जांत. भारतात ७० कोटी लोकांची बँक खाती असल्याचं त्यांनी नमूद केलं.