भारताला शांतता आणि सद्भावाचा मोठा वारसा - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
ग्रामीण भारत महोत्सवात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
ग्रामीण भारत महोत्सवात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

काही लोक जातीच्या राजकारणाचे विष पसरवून समाजात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तोफ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर डागली. ग्रामीण भारताने शांतता आणि सद्भावाचा वारसा भक्कम करून अशी कारस्थाने उधळून लावावी, असे आवाहन त्यांनी केले. 

प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे ग्रामीण भारत महोत्सव २०२५चे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. हा महोत्सव नऊ जानेवारीपर्यंत चालणार आहे. आम्हाला गावांमध्ये शांतता आणि सद्भावाचा वारसा भक्कम करण्यासाठी काम करावे लागेल. आधीच्या सरकारने ग्रामीण भारताची उपेक्षा केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही गावांना अनेक दशके मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागले. पण आपले सरकार गावांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांना सशक्त करीत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पुढे नेण्यासाठी गावांची भूमिका निर्णायक ठरणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, “ज्यांना कोणी विचारले नाही अशांची आपण पूजा केली. गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी गावातील प्रत्येक वर्गाचा विचार करुन आर्थिक धोरणे आखली आहेत.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter