वेदांत शिक्षक जोनास मॅसेटी आणि त्यांच्या पथकाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पुनर्वापरयोग्य ऊर्जेसाठी भागीदारी करण्याबाबतच्या करारावर शिक्कामोर्तब झाले आहे. जी-२० परिषदेसाठी ब्राझीलमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात चर्चा झाली. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. ऊर्जा भागीदारी करार केल्यानंतर आता आर्थिक सहकार्य करार करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जी-२० परिषदेचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी गयाना या देशात दाहाल झाले आहेत. मात्र तत्पूर्वी त्यांनी विविध राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली. याचवेळी दुसरी भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदही घेण्यात आली. उभय देशांत संरक्षण आणि सुरक्षा, वाहतूक, विज्ञान आणि संत्रज्ञान, शिक्षण अशा क्षेत्रांमधीत संबंध वृद्धिंगत करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला. दोन्ही देशांची एकत्रित ताकद वाढावी, दोपांची सुरक्षा वाढावी आणि शांतता कायम राहावी, यासाठी संरक्षण क्षेत्रातील भागीदारीसाठी दीर्घकालीन चोरण आखण्याबाबतही चर्चा झाली. यावेळी मोदी यांनी अँथनी अल्वानीज यांच्याबरोबर ऊर्जा भागीदारीकाका चर्चा बेोली, पानंतर दोघांच्या उपस्थितीत पुनर्वापरयोग्य ऊर्जा भागीदारी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. दोन्ही देशांत झालेल्या या करारान्वये सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन, ऊर्जा साठवणूक आणि गुंतणणूक या क्षेत्रांमध्ये एकमेकांना प्राधान्य दिले जाणार आहे.
वेदांत शिक्षकाला मोदी भेटले
पंतप्रधान मोदी यांनी ब्राझीलमध्ये वेदांत आणि भगवद्गीता शिकाषिणाज्या जोनास मॅसेटी यांची भेट घेत त्यांचे कौतुक केले. मॅसेटी हे अभियंत आहेत. मॅसेटी हे ब्राझीलमध्ये विश्वनाथ म्हणूनही ओळखले जातात. मोदींना ते भेटायला आले त्यावेळी त्यांनी पांढरे चोतर नेसले होते आणि कपाळावर टिळा होता. मॅसेटी यांच्या पथकाने रामायणावर आधारित एक संस्कृत नाट्यछटाही सादर केली. भारतीय संस्कृतीचा जगभरात प्रभाव असल्याचे पाहून आनंद बाटल्याचे मोदींनी 'एक्स वर सांगितले.
मोदी गयानामध्ये दाखल
ब्राझीलचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी गयाना देशात दाखल झाले आहेत. या देशाला भेट देणारे ते मागील पत्रासहून अधिक वर्षातील पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. येथील विमानतळावर मोदीच्या स्वागतासाठी गयानाचे अध्यक्ष इरफान अली, पंतप्रधान मार्क अँथनी फिलिप्स आणि डझनभर मंत्री उपस्थित होते. मोदींच्या निवासाची व्यवस्था केलेल्या हॉटेलमध्येही हे सर्वजण उपस्थित होते. तसेच यावेळी ग्रेनाडाचे पंतप्रधान डिकन मिशेल आणि बाबांडोसचे पंतप्रधान मिया अमोर मोठली हेदेखील उपस्थित होते. भारत आणि गयाना यांच्यातील मैत्रीचे निदर्शक म्हणून मोदींना जॉर्जटाऊन शहराची किल्ती भेट म्हणून देण्यात आली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter