महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये 'काँटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. आज राज्यभर चुरशीने मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी जाहीर झालेल्या मतदानोत्तर कलचाचण्यांनी महायुतीच्या पदरामध्ये सत्तेचे माप टाकले. महाविकास आघाडीच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे.
राज्यभर दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढल्याने प्रमुख राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. 'मॅट्रिझ', 'पीपल्स पल्स' आणि 'चाणक्य' आदी माध्यमसंस्थांनी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती पुन्हा सत्ताधीश होईल असा अंदाज वर्तविला आहे. झारखंडमध्येही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अनेक माध्यमसंस्थांनी झारखंडमध्ये त्रिशंकू कौल मिळेल असा अंदाज वर्तविला आहे.
महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे महायुतीच्याच बाजूने कौल मिळण्याचा अंदाज असून महायुतीला १५३ तर महाविकास आघाडीला १२६ च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यामध्ये बहुमतासाठी कोणत्याही आघाडीला १४५ जागा मिळणे गरजेचे आहे.
कोणत्याच आघाडीला बहुमत मिळाले नाही तरअपक्ष आणि अन्य छोटे पक्ष किंगमेकर ठरू शकतात. झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीची सत्ता असून येथेही त्यांचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत अटीतटीचा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता असून सहा माध्यमसंस्थांच्या कलचाचण्यांनी भाजप आघाडीच्या बाजूने कौल दिला असून ‘इंडिया’ आघाडीला ३८ पेक्षाही कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही माध्यमसंस्थांनी येथे त्रिशूंक कौल मिळेल असा अंदाज वर्तविला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter