तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताची वाटचाल महाशक्तीकडे सुरू असल्याचे म्हटले जाते; परंतु या देशातील सुमारे २५.६ टक्के तरुण शिक्षण, रोजगार तसेच कौशल्य विकासापासून दूर आहे. देशाच्या विकासाचे इंजिन समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे प्रमाण सुमारे १७ टक्के असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाचा सर्वसमावेशक वार्षिक अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यासाठी जुलै २०२२ ते जून २०२३ या कालावधीत देशभरातील तीन लाखांहून अधिक कुटुंबांपर्यंत जाऊन संवाद साधण्यात आला. यात शिक्षण, आरोग्य, आर्थिक सर्वसमावेशकता, रोजगार, मोबाइल-इंटरनेट, संगणक कौशल्यसह अन्य विषयांचा आढावा घेण्यात आला. सध्या शिक्षण, कौशल्यविकासासाठी प्रयत्न सुरू असतानाही पाच टक्के तरुणाईला किमान लेखन-वाचन करता येत नसल्याचे अहवालात नमूद केले.
सर्वेक्षणातून महत्त्वाची निरीक्षणे
-
१५-२४ वयोगटातील ९७.८ टक्के पुरुष आणि ९५.९ टक्के महिला दैनंदिन जीवनासाठी आवश्यक किमान लेखन-वाचन करण्यास सक्षम
-
६ ते १० वयोगटातील शहरातील ८९.२ टक्के, तर ग्रामीण भागातील ९०.५ टक्के विद्यार्थ्यांची प्राथमिक शाळेत नावनोंदणी
-
२५ वर्षांवरील शहरी भागातील ५६.६ टक्के, तर ग्रामीण भागातील ३०.४ टक्के तरुणाईने माध्यमिक व त्यापुढील शिक्षण घेतले आहे.
-
वर्षभरात आरोग्यावर प्रतिकुटुंब खर्च हा ग्रामीण भागात सरासरी ४,१२९ रुपये, तर शहरी भागात ५,२९० रुपये होता.
-
देशातील १८ वर्षांपुढील ९४.६ टक्के तरुणांचे बँकेत वैयक्तिक तसेच संयुक्त खाते
-
१५ ते २४ वयोगटातील ७८.४ तरुणाई