७६व्या प्रजासत्ताक दिनाची सर्वजण वाट पाहून आहेत. काही दिवसातच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीत आणि देशभर २६ जानेवारीच्या अनुषंगाने तयारी देखील सुरू झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभर तिरंगा फडकवला जातो. संपूर्ण देशभर अनेक ठिकाणी तिरंगा झेंडा तयार करण्याचे काम जोरात चालू आहे.
जम्मू आणि काश्मिरमध्ये देखील तिरंगा झेंडा बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याठिकाणी पाकिस्तानशी लागून असलेल्या सीमेवरील एका गावात बिश्नाह येथे तिरंगा तयार करण्याचे काम महिला स्वयं सहाय्य समूह करत आहेत. या समूहात हिंदू आणि मुस्लिम महिलांचा समावेश आहे.
हिंदू-मुस्लिम महिलांनी मिळून तयार केले झेंडे
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी जम्मूतील बिश्नाह गावात महिला स्वयं सहाय्य समूह राष्ट्रीय ध्वज तयार करण्यात व्यस्त आहे. विविध धर्मातील महिलांनी मिळून तयार झालेला हा समूह प्रजासत्ताक दिनाला प्रत्येक घरांवर तिरंगा फडकवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. स्वयं सहाय्य समूहाच्या सदस्या अनीता बारू याविषयी बोलताना म्हणतात, “आमच्या इथे कोणत्याही प्रकारचा जातिभेद नाही. तिरंगा झेंडा बनवण्यासाठी सर्व जाती धर्माच्या महिला एकत्र आले आहेत. आम्ही सर्वजण मिळून तिरंगा झेंडा बनवत असल्याचा आम्हाला गर्व आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही या कामाला भविष्यातही कायम ठेवू."
या महिलांनी तयार केलेले झेंडे सीमेजवळच्या भागात, क्लस्टर आणि ब्लॉकमध्ये वितरित केले जातात. हे झेंडे केवळ घरावर नाही तर प्रत्येक कार्यालयामध्ये फडकवले जातात. याविषयी बोलताना शीतल कुमारी म्हणतात, “वेगवेगळ्या धर्मांच्या महिला एकत्र येऊन तिरंगा झेंडा बनावट आहे हे पाहून आनंद वाटतो. आम्हाला गर्व आहे की आम्ही देशासाठी काहीतरी करत आहोत."
महिलांसाठी रोजगार
याठिकानच्या अनेक महिलांसाठी या उपक्रमाने रोजगाराचा महत्त्वपूर्ण स्रोत तयार केला आहे. रेश्मा कुमारी आणि नीरू शर्मा यांनी सांगितले की, “हे काम आम्हाला आवडते. आम्हाला आम्ही करत असलेल्या कामाचा अभिमान आहे. कारण आम्हाला माहीत आहे आम्ही हाताने तयार केलेले तिरंगे झेंडे देश आणि सैनिकांच्या सन्मानासाठी फडकवले जातात.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter