चिपळूणमध्ये मुस्लीम समाज महायुतीच्या पाठीशी?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ते प्रामाणिकपणे प्रचार मोहिमेत कुठल्याही आमिषाला बळी न पडता महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी व्यक्त केले. 

चिपळूण विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) निकम निवडून आले. त्यामध्ये अल्पसंख्याक समाजाने निकम यांच्या विजयात निर्णायक भूमिका घेतली. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अल्पसंख्यांकाची निर्णायक मते आमदार निकम यांना मिळाली. याबाबत जाकीर शेकासन म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने अल्पसंख्यांकाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात या समाजाची मते पारड्यात पाडण्यासाठी यशस्वी झाले 

मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाची मते आपल्याकडे वळवण्यात महायुतीचे उमेदवार निकम यशस्वी झाले, हे त्यांचे व्यक्तीगत यश आहे. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील अल्पसंख्याक प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी निकम यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले.

 या निवडणुकीतही समाजात विषारी आणि दिशाभूल करणारा प्रचार करण्यात आला; मात्र अल्पसंख्याक आमदार शेखर निकम यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला. कोणत्याही आमिषाला बळी पडला नाही. अल्पसंख्याक सेलचे चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी, ज्येष्ठ कार्यकर्ते सलीम पालोजी, बरकत पाते, इमाम शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शौकत मुकादम, माजी नगराध्यक्षा रेहाना बिजले, फैरोजा मोडक, करामत मिठागरी, नूर बिजले, जमीर मुल्ला, शौकत माखजनकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते प्रचार मोहिमेत सहभागी झाले होते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter