ज्ञानवापी प्रकरणात मुस्लीम पक्षाने मांडली बाजू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

ज्ञानवापी मस्जिद प्रकरणावर सध्या सुनावणी सुरु आहे. अंजुमन इंतजामिया समितीच्या वकिलांनी मंगळवारी जलदगती न्यायालयात हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेबाबत आपली मते सादर केली. हिंदू पक्षाने या याचिकेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून ग्यानवापी संकुलाच्या उर्वरित भागाचा सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आपल्या युक्तिवादात मुस्लीम पक्षाने हिंदू पक्षाच्या मंदिर असल्याच्या दाव्याला विरोध केला आहे. यावेळी त्यांनी ग्यानवापी संकुलाच्या स्थापनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आधीच एकदा पुरातत्त्व सर्वेक्षण झाल्याचा दाखला दिला.  मस्जिदच्या भागात कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण किंवा खणणे केल्यास मशिदीला हानी होऊ शकते, असा दावा यावेळी मुस्लीम पक्षाकडून न्यायालयात करण्यात आला आहे.  

हिंदू पक्षाने संकुलात मंदिर असल्याचा दावा करत नवीन सर्वेक्षणाची मागणी केली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर वाराणसीतील ग्यानवापी मस्जिदच्या सर्वेक्षणासाठी न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (ASI) सर्वेक्षणाची परवानगी दिली होती, परंतु मुस्लिम पक्षाचे वकील म्हणाले की, हे सर्वेक्षण कोणत्याही धर्माच्या श्रद्धास्थानाचे उल्लंघन ठरेल.

सुनावणीदरम्यान, त्यांनी ग्यानवापी मस्जिदचा इतिहास, धार्मिक महत्त्व, आणि मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना यावर भर दिला. त्यांनी दावा केला की, पूजा स्थळ कायद्याच्या अंतर्गत ग्यानवापी मस्जिदवर कोणताही बदल केला जाऊ नये. मुस्लिम पक्षाने म्हटले आहे की, ग्यानवापी मस्जिदमध्ये धार्मिक प्रतिष्ठानांचे उल्लंघन होत आहे आणि १९९१च्या पूजा स्थळ कायद्यामुळे कोणतेही बदल किंवा सर्वेक्षण करता येणार नाही. याबाबत पुरातन सर्वेक्षणाच्या आधारे तांत्रिक मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे मस्जिदला हानी होऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.

मुस्लिम पक्षाच्या सुनावणीनंतर, कोर्टाने पुढील सुनावणीची तारीख १० ऑक्टोबर २०२४ निश्चित केली आहे. या सुनावणीमध्ये अधिक तपशीलवार मांडणी आणि दोन्ही बाजूंचे मुद्दे सादर केले जातील.