‘या’ चार मुस्लिमांचा मरणोत्तर शौर्य पुरस्कारांनी सन्मान

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 3 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी (५ जुलै) राष्ट्रपती भवनात देशाच्या शूरवीरांना कीर्ती आणि शौर्य चक्र देऊन सन्मानित केले. विशेष शौर्य, अदम्य साहस आणि कर्तव्याप्रती अत्यंत समर्पण दाखवल्याबद्दल या पुरस्काराने शूरवीरांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रपतींनी सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश पोलिसांना १० कीर्ती चक्र (सात मरणोत्तर) आणि २६ शौर्य चक्र (सात मरणोत्तर) प्रदान केले आहेत. 

अब्दुल मजीद यांना मरणोत्तर कीर्ती चक्र 
शहीद कॉन्स्टेबल अब्दुल मजीद हे २०११ पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या पॅराशूट रेजिमेंटच्या (स्पेशल फोर्स) ९व्या बटालियनचे पथक कमांडर होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये राजौरी येथे चकमकीत ते शहीद झाले. त्या मोहिमेदरम्यान त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानासाठी त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यावतीने त्यांच्या पत्नीने राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.  

सफीउल्लाह कादरी यांना मरणोत्तर शौर्य चक्र
शहीद सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल (SGCT) सफिउल्ला कादरी जम्मू काश्मीर पोलीस दलात कार्यरत होते. मे २०२२ मध्ये श्रीनगरमधील बिशंबर नगर मोहिमेमध्ये दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. मोहिमेदरम्यान त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामिरीसाठी त्यांना मरणोत्तर शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी  राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. 

फ़रोज़ अहमद डार यांना मरणोत्तर शौर्य चक्र
शहीद एसएचओ सब इन्स्पेक्टर फ़रोज़ अहमद डार हे जम्मू-काश्मीर पोलीस दलात कार्यरत होते. जून २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अचाबलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ते शहीद झाले. फ़रोज़ अहमद डार यांच्या असाधारण शौर्यासाठी त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी  राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. 

मुस्तफा बोहरा यांना मरणोत्तर शौर्य चक्र
शहीद मेजर मुस्तफा बोहरा हे उदयपूर जिल्ह्यातील पहिले शहीद लष्करी अधिकारी होते. २०२२ मध्ये मोहिमेवरून परतत असताना अरुणाचल प्रदेशमध्ये हेलिकॉप्टर अपघातात ते शहीद झाले. सैन्यदलातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी  कामगिरीसाठी त्यांना मरणोत्तर शौर्य चक्राने त्यांना सन्मानित केले. मेजर मुस्तफा यांची आई फातेमा आणि वडील झकीउद्दीन बोहरा यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान स्वीकारला. 

जम्मू-काश्मीर येथील जवानांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले
जम्मू-काश्मीर पोलिसमध्ये शौर्य गाजवणाऱ्या सांच्या एका एका  कॉन्स्टेबलनाला मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. याशिवाय इतर सहा लष्करी जवानांचाही सन्मान करण्यात आला. लष्कर, हवाई दल, नौदल आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनालाही शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे. अशोक चक्र आणि कीर्ती चक्रानंतर शौर्य चक्र हा भारतातील तिसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहे.

यावर्षी शौर्य पुरस्कार मिळवणारे पुरस्कारार्थी 

कीर्ति चक्र 

जीडी दिलीप कुमार दास (सीआरपीएफ)
जीडी राज कुमार यादव (सीआरपीएफ)
जीडी बबलू राभा (सीआरपीएफ)
जीडी शम्भू रॉय, २१० कोबरा (सीआरपीएफ)
पवन कुमार, ग्रेनेडियर्स, ५५ वी बटालियन राष्ट्रीय राइफल्स (लष्कर)
अंशुमान सिंह, आर्मी मेडिकल कोर, २६ वी बटालियन पंजाब रेजिमेंट (लष्कर)
अब्दुल मजीद, ९वी बटालियन पॅराशूट रेजिमेंट (विशेष दल) (लष्कर)

शौर्य चक्र 

सफीउल्लाह कादरी (जम्मू-कश्मीर पोलीस)
विकास भांभू (लष्कर)
मुस्तफा बोहरा (लष्कर)
कुलभूषण मंटा (लष्कर)
विवेक सिंह तोमर (लष्कर)
आलोक राव (लष्कर)
एमवी प्रांजल (लष्कर)

कीर्ति चक्र 

दिग्विजय सिंह रावत, २१वी बटालियन पॅराशूट रेजिमेंट (लष्कर)
दीपेन्द्र विक्रम बसनेत, चौथी बटालियन शीख रेजिमेंट (लष्कर)
पवन कुमार यादव, २१वी बटालियन महार रेजिमेंट (लष्कर)

शौर्य चक्र 

जीडी गामित मुकेश कुमार (सीआरपीएफ)
अमित रैना (जम्मू-कश्मीर पोलीस)
फ़रोज़ अहमद डार (जम्मू-कश्मीर पोलीस)
बिभोर कुमार सिंह (सीआरपीएफ)
वरुण सिंह (जम्मू-कश्मीर पोलीस)
मोहन लाल (जम्मू-कश्मीर पोलीस)
राजेंद्र प्रसाद जाट (लष्कर)
रविंदर सिंह रावत (लष्कर)
नायक भीम सिंह (लष्कर)
सचिन नेगी (लष्कर)
मानेओ फ्रांसिस (लष्कर)
शैलेश सिंह (वायु दल)
बिमल रंजन बेहरा (नौदल)
संजय कुमार (लष्कर)
ऋषिकेश जयन करुथेदाथ (वायु दल)
अक्षत उपाध्याय (लष्कर)
संजय कुमार भ्रमर सिंह (लष्कर)
अमनदीप जाखड़ (लष्कर)
परषोत्तम कुमार (लष्कर)