भारत सरकारकडून एक आदेश जारी करण्यात आला आहे. अनेक सरकारी कर्मचारी त्यांच्या ऑफिसच्या कॅम्प्युटर आणि लॅपटॉपवर AI App जसे की ChatGPT, DeepSeek चा वापर टाळण्यास सांगितले आहे. त्यामुळे भारत सरकारचे कॉन्फिडेशियल डॉक्यूमेंट आणि डेटा धोक्यात येऊ शकतो असे अर्थ मंत्रालयाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
AI टूल्स न वापरण्याचा सल्ला
भारताच्या अर्थ मंत्रालयाने आपल्या कर्मचाऱ्यांना सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपनीयतेमुळे AI टूल्सचा वापर टाळण्यास सांगितले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इटलीसारख्या देशांनी डेटा सुरक्षेच्या जोखमीचे कारण देत DeepSeek च्या वापरावर असेच निर्बंध लादले आहेत. ओपनएआयचे प्रमुख सॅम ऑल्टमन यांच्या बुधवारी होणाऱ्या भारत भेटीपूर्वी मंगळवारी सोशल मीडियावर या अॅडव्हायझरीचे वृत्त समोर आले. भारतीय अर्थ मंत्रालयाच्या २९ जानेवारीला म्हटले आहे की कार्यालयातील संगणक आणि साधनांमधील AI टूल्स आणि AI अॅप्स सरकारी डेटा आणि दस्तऐवजांच्या गोपनीयतेस धोका निर्माण करतात.
भारतात OpenAI वर टीका
भारताचे अर्थ मंत्रालय, चॅटजीपीटी-पालक OpenAI आणि डीपसेकच्या प्रतिनिधींकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अर्थ मंत्रालयाच्या तीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही नोट खरी आहे आणि या आठवड्यात अंतर्गत जारी करण्यात आली आहे. अन्य मंत्रालयांकडून अशा सूचना आल्या आहेत की नाही, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. OpenAI ने देशातील आघाडीच्या मीडिया हाऊसेससोबत कॉपीराईट उल्लंघनाच्या लढाईमुळे भारतात टीकेला सामोरे जावे लागत आहे, देशात सर्व्हर नाहीत आणि भारतीय न्यायालयांनी या प्रकरणाची सुनावणी करू नये, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.