नागालँडमध्ये निवडणुकीचा उत्साह

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 11 d ago
प्राथनिधिक चित्र
प्राथनिधिक चित्र

 

नागालँड मध्ये तब्बल २० वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकशाहीचा उत्सव म्हणजेच निवडणूका काल बुधवारी पार पडल्या. नागालँडच्या जनतेने निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी घेतला. यावेळी नागरिकांनी विक्रमी असे ८० % मतदान केले. ही निवडणूक त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत घेण्यात आली.   

नागालँडमध्ये २० वर्षांनी निवडणूक : 
संस्कृति आणि विविध कला गुणांनी संपन्न असलेल्या नागालँड राज्यात ताववळ २० वर्षांनी स्थानिक ससवराज्य संस्थेच्या निवडणूक होत आहेत. यापूर्वी २००४ मध्ये या निवडणूका घेण्यात आल्या होत्या. नागालँडमध्ये तीन नगरपालिका आणि २२ नगर परिषदांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत पहिल्यांदाच ३३% आरक्षण महिलांना देण्यात आले. या निवडणुकांसाठी एकूण ११ राजकीय पक्षांचे ५२३ उमेदवार रिंगणात होते. 

निकाला संदर्भात : 
येथील एकूण दहा जिल्ह्यातील २१४ वॉर्डांमध्ये ४२० मतदान केंद्रांवर मतदान ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांवर (बॅलेट पेपर) घेण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा निकाल २९ जून रोजी जाहीर होणार आहेत. 

निवडणुकांमध्ये सहभागी पक्ष : 
भाजप, काँग्रेस, नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ), एनडीपीपी, रायझिंग पीपल्स पार्टी, एलजेपी, आरपीआय (आठवले गट) संयुक्त जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, एनडीपीपी आणि एनपीपी
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter