राज्यातील विधानसभेची मुदत नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी साडेतीन वाजता आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच बिगुल आज वाजणार आहे. आजपासून दोन्ही राज्यात आचारसंहिता लागू होईल.
महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे जागा वाटप सुरु आहे. दुसरीकडे शिंदे सरकारने विविध योजना जाहीर करण्याचा धडका लावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले आहे. काही जागाबाबतचा पेच लवकरच सुटणार आहे. गेल्या वेळी ( 2019) 21 ऑक्टोबर 2019 रोजी एकाच टप्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत एकूण 61.4 टक्के मतदान झाले होते.
शिवसेना- भाजपची युती होती. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते, पण निवडणूक निकालानंतर युती तुटली. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. पण मुख्यमंत्री कोण होणार हा तिढा सुटल्यामुळे शिवसेना अन् भाजपमध्ये मतभेद होऊन युती संपुष्टात आली. कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता येणार नसल्याने चित्र निर्माण झाल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपला साथ दिली. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस आणि अजितदादांनी बहुमत चाचणीच्या आधीच 26 नोव्हेंबर 2019 रोजी राजीनामा दिला.
राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी या नवीन युतीची स्थापना करीत 28 नोव्हेंबर 2019 रोजी सरकार स्थापन केले.उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन केले. शिवसेनेचे नेते, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या काही निकटवर्तीय आमदारांसह गुवाहटी गाठली. शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांना जाऊन मिळाले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरका स्थापन झाले. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले. अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter