‘ईद ए मिलाद’चा जुलूस २९ सप्टेंबरला; वणीत मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
पंच कमिटी सदस्यांनी वणी पोलिस ठाण्यात येऊन यासंबंधीचे पत्र दिले
पंच कमिटी सदस्यांनी वणी पोलिस ठाण्यात येऊन यासंबंधीचे पत्र दिले

 

हिंदूधर्मियांचा प्रमुख उत्सव असलेला अनंत चतुर्दशी अर्थात गणपती विसर्जन आणि मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद हे दोन्ही उत्सव २८ सप्टेंबरला एकाच दिवशी आल्याने सामाजिक शांतता अबाधित राहावी.

दोन्ही धर्मातील ‘भाईचारा’ टिकून राहावा, यासाठी वणीतील मुस्लीम बांधव व पंच कमिटीने बैठक घेऊन गणेश विसर्जनानंतर २९ सप्टेंबरला ईद-ए-मिलादचा जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

धर्माच्या नावावर सर्वत्र राजकारणाची पोळी शेकली जात असताना, वणी येथे धार्मिक एकतेचे दर्शन बघायला मिळाले आहे. मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिस प्रशासनाच्या डोक्याच्या मोठा ताण कमी झाला आहे.

वणी परीसरात गणेशोत्सवाची तयारी शिगेला पोहोचली आहे. १९ सप्टेंबरला गणपतीची प्रतिष्ठापना होईल. २८ ला अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप दिला जाईल. याच दिवशी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण आहे.

गणेश विसर्जनाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. तसेच आपलाही उत्सव तितक्याच आनंदात साजरा करता यावा, म्हणून मुस्लीम समाजातील पंचकमिटीने प्रस्ताव मांडला व त्यास सर्व मुस्लिम बांधवांनी एकमताने पाठिंबा दर्शविला व वणी पोलिस ठाण्यात पंच कमिटी सदस्यांनी येऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांना ईद ए मिलादचा उत्सव २९ सप्टेंबरला सकाळी नऊनंतर साजरा करणार असल्याचे पत्र दिले.

या वेळी ऐजाज पठान, बब्बू शेख, बंटी सय्यद, नियाज शेख, फईम शेख, आयुब मुल्ला, रमीज काजी, आरीफ शेख, मुजीब दादा आदी उपस्थित होते.
 
सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांनी मुस्लिम बांधवाच्या भूमिकेचे कौतुक व अभिनंदन केले. यापूर्वीही मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला होता.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध झालेल्या धार्मिक सौहार्दाच्या या बातम्याही जरूर वाचा 👇🏻

 

अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

 

जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन; गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय

 

किन्हवलीतील मुस्लिम बांधवांचे एक पाऊल पुढे


अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी. मिरवणुकीबाबत मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र होतेय कौतुक

 

अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद एकाच दिवशी आल्यामुळे सोलापूरच्या मुस्लीम समाजाने घेतला 'हा' निर्णय


अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी, मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय


नाशिकच्या चांदोरीतील मुस्लीम समाजाने घेतला 'हा' ऐतिहासिक निर्णय  

 


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट, चर्चा आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  - 

 

WhatsApp | Telegram | Facebook

Twitter | Instagram | YouTube