'या' तारखेला मिळणार 'ईद-ए-मिलाद-ऊन-नबी'ची सुट्टी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सोमवारी ईद मिलादची शासकीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता बुधवारी म्हणजे १८ सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे. ईद मिलाद हा मुस्लीम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हिंदूंचा सण असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत मध्ये बदल करण्यात आलेला आहे. याविषयी शासकीय परिपत्रक काढण्यात आले आहे

ईद-मिलाद-ऊन-नबी का आहे मुस्लिमांसाठी महत्त्वाचे
इस्लामिक कॅलेंडरमध्ये ईद-मिलाद-ऊन-नबी हा दिवस पैंगबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी अल्लाने पैंगबर यांना पृथ्वीवर पाठवलं होतं असं मानलं जातं. इस्लामिक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यात रबी-उल-अवलमध्ये साजरा केला जाणारा हा उत्सव आहे. याला ईद सारखंच पवित्र मानलं जातं. इस्लाममध्ये हा देखील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव जमा होतात आणि जुलूस कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

१७ सप्टेंबर म्हणजे मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेले असतात. त्यामुळे वाद निर्माण होऊ नये आणि सामाजिक सलोखा कामय राहावा यासाठी ईद मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल करण्यात आला आहे.