पूर्व लडाख सीमावाद मिटविण्यासाठी दुपटीने प्रयत्न करणार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 3 d ago
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी

पूर्व लडाखमधील उर्वरित सीमावाद मिटविण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी मार्गांनी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी वेग आणण्याची तयारी आज भारत आणि चीनने दर्शविली. शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात आज स्वतंत्रपणे भेट होऊन विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

सीमाभागात शांतता कायम राहण्यासाठी सीमावाद मिटविणे आणि नियंत्रण रेषेचा आदर राखला जाणे आवश्‍यक असल्याचे जयशंकर यांनी भेटीदरम्यान स्पष्ट केले. तसेच, द्विपक्षीय संबंध हे परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता यांना जपतच सुधारू शकतात, यावर जयशंकर यांनी भर दिला. जयशंकर यांच्या बोलण्याला वँग यांनी दुजोरा देताना पूर्व लडाखमधील उर्वरित सीमावाद मिटविण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये वेग आणण्याचे कबूल केले. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील काही संघर्ष बिंदूंवरील वाद मिटला असून काही ठिकाणांबाबत मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही.

पाश्‍चिमात्य देशांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी चीन आणि रशियासह पूर्वीच्या सोविएत महासंघातील चार देशांनी २००१ मध्ये ‘एससीओ’ची स्थापना केली होती. या परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे परिषदेला उपस्थित आहेत. दरम्यान, पुढील वर्षी शांघाय सहकार्य संघटनेच्या अध्यक्षपदासाठी चीनला भारताचा पाठिंबा देखील परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी वांग यी यांना कळविला. ता. ४ (पीटीआय) : पूर्व लडाखमधील उर्वरित सीमावाद मिटविण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी मार्गांनी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी वेग आणण्याची तयारी आज भारत आणि चीनने दर्शविली. शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात आज स्वतंत्रपणे भेट होऊन विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

सीमाभागात शांतता कायम राहण्यासाठी सीमावाद मिटविणे आणि नियंत्रण रेषेचा आदर राखला जाणे आवश्‍यक असल्याचे जयशंकर यांनी भेटीदरम्यान स्पष्ट केले. तसेच, द्विपक्षीय संबंध हे परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता यांना जपतच सुधारू शकतात, यावर जयशंकर यांनी भर दिला. जयशंकर यांच्या बोलण्याला वँग यांनी दुजोरा देताना पूर्व लडाखमधील उर्वरित सीमावाद मिटविण्यासाठी सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये वेग आणण्याचे कबूल केले. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील काही संघर्ष बिंदूंवरील वाद मिटला असून काही ठिकाणांबाबत मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही.

पाश्‍चिमात्य देशांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी चीन आणि रशियासह पूर्वीच्या सोविएत महासंघातील चार देशांनी २००१ मध्ये ‘एससीओ’ची स्थापना केली होती. या परिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे परिषदेला उपस्थित आहेत. दरम्यान, पुढील वर्षी शांघाय सहकार्य संघटनेच्या अध्यक्षपदासाठी चीनला भारताचा पाठिंबा देखील परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी वांग यी यांना कळविला.