विधानसभा निवडणूकमध्ये उमेदवार उभे न करण्याचा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवार ता.4 रोजी अंतरवाली सराटी ता.अंबड येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे.
अंतरवाली सराटी या ठिकाणी दोन दिवसापासून मनोज जरांगे समीकरण कसे जुळतील , उमेदवार ,मतदार संघ निवडणे या करीता प्रयत्न करत होते रविवारी जरांगे यांना उपस्थित इच्छुक व नागरीक यांच्या सोबत चर्चा केली होती पंधरा ते वीस जागेवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली होती परंतु उर्वरित यादी अंतिम झाली नाही, अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस व कमी वेळ शिल्लक राहिल्याने व मित्र पक्षाकडून यादी वेळेत न आल्याने जरांगे यांनी उमेदवार उभे न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
उमेदवारीसंबंधी चर्चा झाली पण आमच्या मित्र पक्षांची यादीच आली नाही. रात्री तीनपर्यंत यादीच आली नाही. एकाच जातीवर कसं निवडूण येणार. हे शक्य नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही. मराठा समाजाच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. एकानेही अर्ज कायम ठेवू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
आपल्याला राजकारणाचा अनुभव नाही, १३ -१४ महिन्यांचा राजकारणाचा अनुभव आहे. एका जातीवर या राज्यात कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे रात्री झालेल्या चर्चेनुसार आपल्याला निवडणूक लढायची नाही. म्हणून राज्यातील सर्व बांधवांना सांगतो की सर्वांनी अर्ज काढून घ्या, एकपण अर्ज ठेवू नका, असे मनोज जरांगे म्हणाले.
राजकारण आपला खानदानी धंदा नाही. आपलं आंदोलन सुरूच आहे. निवडणूक संपली की आपलं आंदोलन पुन्हा सुरू राहिल. पुन्हा आपल्या जातीसाठी लढू असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. जमलेल्या समाजाने एका जातीवर जिंकू शकत नाही असे सांगितल्याचंही जरांगे यांनी नमूद केलं.
या वेळी जरांगे यांनी सांगितले की, रविवारी रात्री मतदार संघाची चाचपणी केली मित्र पक्षाकडून सकाळ पर्यंत यादी आली नाही आमचे जवळपास पंचवीस मतदार संघा बाबत चर्चा झाली होती काही मतदार संघाचा विषय प्रलंबित होता एका जातीवर निवडून लढवणे शक्य नव्हते , मित्र पक्षाची यादी आलेली नाही अर्ज वापस घेण्याची आजची शेवटची तारीख आहे वेळ कमी आहे त्यामुळे सर्वांना विचारुण विधानसभेत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे असे जरांगे यांनी या वेळी जाहीर केले.आपला राजकारण हा खानदानी धंदा नाही राज्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांनी ते काढुण घेण्याचे अवहान जरांगे यांनी केले.
याला माघार म्हणायचं का?
विधानसभा निवडणूक संपली कि आपले आरक्षण बाबतचे आंदोलन सुरु होणार आहे हि निवडनुक आपल्या लढायची नाही ज्यांनी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला ,त्रास दिला ,त्यांना या निवडणूकत जनता धडा शिकवेल. लोकांनी कोणाला पाडायचे व कोणाला निवडुन आणायचे हे ठरवावे मतदार संघ ठरवले होते उमेदवार यांचे नाव घोषीत करावयाचे होते.
माघार घ्यायचे असते तर हि प्रक्रिया केली नसती एका जातीवर निवडनुक लढणे शक्य नव्हते, मित्र पक्षाची यादी लवकर मिळाली नाही म्हणून उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे समाजाला अडचणीत आणायचे नाही गनिमी कावा करूण समोरच्यांना धडा शिकवला जाणार आहे ज्यांना निवडून आणायचे त्यांच्याकडून समाजाने लेखी घ्यावे मी कोणाला पाडा म्हणत नाही व निवडून आणा म्हणत नाही तो निर्णय समाज घेणार आहे मला कोणी डिवचले तर मात्र लोकसभा निवडनुक प्रमाणे कार्यक्रम होणार आम्ही कोणत्याही राजकिय पक्षाला ,संघटना, अपक्षांना पाठींबा दिला नाही
महायुती ,महाविकास आघाडी यांचा माझ्यावर दबाव नाही मी समाज जे ठरवतो त्या प्रमाणे काम करतो दबावला मी भित नाही निवडुन येऊन राजकिय संपावयाचे होते आता पाडुन संपवु असा इशारा जरांगे यांनी दिला.पुढील चौदा दिवसात मी माझ्या समाजासाठी राज्यात फिरणार आहे समाज बरोबर ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडणार आहे ज्यांनी त्रास दिला त्यांना राजकारणात सोडणार नाही मतदारांनी गुपचूप मतदान करायला जायच गुपचूप पाडुण वापस यायच कोणाच्या डोळ्यावर यायच नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.