भारतीय खानपानातील वैविध्य टिकवा - सोहेल हाश्मी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 17 h ago
 पुणे: 'भारत एक खोज' व्याख्यानमालेत 'भारत के स्वाद' विषयावर बोलताना सोहेल हाश्मी.
पुणे: 'भारत एक खोज' व्याख्यानमालेत 'भारत के स्वाद' विषयावर बोलताना सोहेल हाश्मी.

 

"ठरावीक खाणे हे विशिष्ट जातधर्माशी जोडून त्याविरोधात प्रचार केला जातो. मात्र, खानपान ही मानवाची संस्कृती आहे. संस्कृती प्रवाही होती, आहे आणि पुढेही राहील. ती प्रवाही असणे हे मानवाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे," असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार सोहेल हाश्मी यांनी केले. लोकायत, ज्ञानभारती, अलर्ट आणि राजीव गांधी स्मारक निधी आयोजित 'भारत एक खोज' व्याख्यानमालेत दुसरे व्याख्यान 'भारत के स्वाद' अंतर्गत ते बोलत होते.

हाश्मी म्हणाले की, उत्तर भारतीयांचे खाणे म्हणजे भारतीय खाणे हे पसरवले जात आहे. पण, काय तमिळनाडू, केरळ, ईशान्यपूर्वेकडील राज्ये ही भारतीय नाहीत का, त्यांचे खाणे भारतीय खाणे नाही का, या प्रश्नावर आपल्याला विचार करावा लागेल. पनीर, तूप यांसारखे पदार्थ पत्रकार प्रतिकान

प्राणिज पदार्थ आहेत. हे आपण समजून घेतले पाहिजे. आज प्रश्न शाकाहार का मांसाहार हा नसून, बहुराष्ट्रीय कंपन्या भारतासारख्या देशातील खाण्यातली विविधता नष्ट करून बी. टी. बियाणांचा व्यवसाय करत आहेत, ज्यामुळे खाण्यातली विविधता नष्ट होण्याबरोबर शेतकरी देशोधडीला लागत आहेत.