मणिपूरचे सार्वजनिक बांधकाममंत्री गोविंददास कोन्थोजम आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट
वांशिक हिंसाचारात गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ होरपळणारे मणिपूर विकासाची वाट चालण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री गोविंददास कोन्थोजम यांनी मणिपुरातील दोन प्रकल्पांबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली. आशियाई विकास बँकेसह जागतिक बँकेच्या सहकार्याने हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.
कोन्थोजम यांनी 'एक्स'वर पोस्ट करत या प्रकल्पांबाबत माहिती दिली. यात त्यांनी म्हटले आहे, की हे प्रकल्प मणिपूरच्या विकासात मैलाचा दगड ठरतील, राज्यातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत या प्रकल्पांचाबत चर्चा केली.
या प्रकल्पांमध्ये आशियायी विकास बँकेच्या सहकायनि उभारला जाणारा इंफाळ रिंग रोड प्रकल्प आणि जागतिक बँकेच्या मदतीने साकारणाऱ्या इन्फोटेक एनेबल्ड विकास प्रकल्पाचा समावेश आहे. इंफाळ रिंग रोड प्रकल्प हा शहरी बांधकाम प्रकल्प असून या प्रकल्पाचा उद्देश मणिपूरची राजधानी इंफाळमधील वाहतूक कोंडी सोडविण्याचा आहे. याअंतर्गत ५९.२३ कि.मी.चा रिंग रोड बांधला जाईल. त्याचप्रमाणे, डिजिटल कौशल्ये, उद्योजकतेला चालना देऊन ब्रॉडबँडची उपलब्धता वाढविणे हा मणिपूर इन्फोटेक एनबल्ड विकास प्रकल्पाचा हेतू आहे. या प्रकल्पामुळे येथील डिजिटल सरकारचा पाया मजबूत होईल, अशी माहितीही त्यांनी दिली
स्फोटके व शस्त्रास्त्रे जप्त
मणिपूरमधील विष्णुपूर आणि थौबाल जिल्ह्यांत सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व स्फोटके जप्त केली. विष्णुपूर जिल्ह्यातील थोंगखॉग्लोक गावातून एक एसएलआर, ०.३०३ रायफल, काडतुसे, दोन पिस्तुले, ग्रेनेड आदी शस्त्रास्त्रे जप्त केली. त्याचप्रमाणे, बौबाल जिल्ह्यातून रायफल, देशी बनावटीची पिस्तुले जप्त करण्यात आली. दरम्यान, बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पक्षाच्या एका सदस्याला पोलिसांनी इंफाळ पूर्व जिल्ह्यातून अटक केली. त्याच्याकडूनही पिस्तुलासह रोख रक्कम जप्त करण्यात आली.
दहशतवाद्यांचा हल्ला
मणिपूरमधील इंफाळ पश्चिम जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी बुधवारी पहाटे नव्याने हल्ला केला. कांगपोकपी जिल्ह्यात टेकड्यांत लपलेल्या दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांमधून गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्या. त्याचप्रमाणे, बॉम्बही फेकले. या वेळी गावांमध्ये तैनात केलेल्या ग्राम स्वयंसेवकांती दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनीही धाव घेतली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter