१४ जुलै २०२३ रोजी इस्रोने पाठवलेले चांद्रयान ३ आता चंद्राच्या कक्षेत फिरत असून तिथून चंद्र आणि पृथ्वीचे फोटो पाठवून खगोलप्रेमींना आनंदाच्या वार्ता देत आहे. चांद्रयान ३ च्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. त्यामुळे यातून मिळणाऱ्या प्रत्येक अपडेट विषयी सर्वांमध्ये कुतुहल दिसून येत आहे. आज इस्रोने या चांद्रयान ३ कडून पाठवण्यात आलेल्या चंद्र आणि पृथ्वीचे फोटो ट्विट केले आहेत.
काय आहे फोटोमध्ये
चांद्रयान ३ ने पाठवलेल्या फोटोंमध्ये एक पृथ्वीची तर दुसरी चंद्राची आहे. हे फोटो कोणत्या कॅमेऱ्यांनी काढण्यात आले याचे डिटेल्स या ट्विटमध्ये देण्यात आले आहेत. इस्रोने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,
जेव्हा चांद्रयान ३ विचारले होते फोटो पाठवू का?
६ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचले. ८ ऑगस्ट रोजी इस्रोने ट्वीटद्वारे खगोलप्रेमींना चंद्राच्या फोटोविषयी विचारले- 'हे पृथ्वीवासियांनो, मी चंद्राच्या कक्षेत पोहचलो आहे. @isro तुम्ही मला फोटो पोस्ट करण्याची परवानगी द्याल का? जेणे करून मी त्यांना जळवू शकेल.'
जगभराचे लक्ष भारताच्या या चांद्रमोहिमेकडे लागले आहे. अमेरिका, रुस, युरोपीय देश, चीन, जपान यांच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत. चांद्रयान ३ जेव्हा ५ ऑगस्ट २०२३ ला चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर फोटो पाठवले होते. तेंव्हा चांद्रयान ३ चंद्राच्या चहूबाजूंनी १९०० किलोमीटर प्रति सेकंद च्या गतीने १६४ बाय १८०७४ किलोमीटरच्या अंडाकृती कक्षेत फिरत होते. जे नंतर कमी होऊन १७० बाय ४३१३ किलोमीटरच्या कक्षेत आले.
असा असणार आहे चांद्रयान ३ चा प्रवास
-
१४ जुलै २०२३ - चांद्रयान ३ चे लाँचिंग
-
३१ जुलै २०२३ - पृथ्वीच्या पाचही कक्षांच्या फेऱ्या करून चंद्राच्या दिशेने कुच केली. याला ट्रांस लूनर इंजेक्शन म्हटले गेले.
-
५ ऑगस्ट २०२३ - चंद्राच्या पहिल्या कक्षेत प्रवेश
-
६ ऑगस्ट २०२३ - दुसऱ्या कक्षेत प्रवेश
-
९ ऑगस्ट - तिसऱ्या कक्षेत प्रवेश
-
१४ आणि १६ ऑगस्ट २०२३ - चौथ्या आणि पाचव्या कक्षेत प्रवेश
-
१७ ऑगस्ट २०२३ - चांद्रयान ३ चे प्रॉपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगवेगळे होतील.
-
१८ आणि २० ऑगस्ट २०२३ - लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग होईल.
-
२३ ऑगस्ट २०२३ - लँडर चंद्राच्या दक्षिणी ध्रूवावर लँड करेल.