केंद्र सरकार देणार शेतकरी संवादावर भार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 18 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

लोकसभा निवडणुकांमधील मर्यादित यशानंतर पंतप्रधान मोदीच्या तिसऱ्या सत्ताकाळात सरकारने शेतकऱ्यांशी संवादावर अधिक भर दिला आहे. या संवादाचा भाग म्हणून कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आता दर मंगळवारी शेतकरी संघटना, शेतकरी नेत्यांशी संवादासाठी राखीव वेळ ठेवण्याची घोषणा केली आहे. यासोबतच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी चौपाल कार्यक्रम देखील सुरू केला जाणार आहे.

सरकारच्या शंभर दिवस पूर्तीनिमित्त कृषी मंत्रालयातर्फे झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कृषीमंत्री शिवराजसिंह
चौहान यांनी ही घोषणा केली.

शेतकरी आणि कृषी क्षेत्राचा विकास करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. दर मंगळवारी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाईल, असे सिंह यांनी सांगितले. त्यासाठी दर मंगळवारी दुपारच्या जेवणाच्या सुटीची आधीची वेळ या संवादासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी व शेतकरी संघटनांशी बातचीत केली जाईल आणि समस्यांची सोडवणूक करता येईल. यासोबतच, 'किसान चौपाल' ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. लॅब टू लँड म्हणजे शेतीशी संबंधित शास्त्रीय व तांत्रिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत त्वरित माहिती पोचवण्यासाठी आधुनिक 'कृषी चौपाल' ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

समितीच्या २३ बैठका
शेतकरी आंदोलनानंतर हे कायदे मागे घेताना पंतप्रधानांनी एमएसपीसाठी समिती नेमण्याची घोषणा केली होती. या समितीच्या सद्यस्थितीबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना चौहान यांनी समितीच्या आतापर्यंत २३ बैठका झाल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांना स्वस्त दरात खतांचा पुरवठा केला जात असल्याचाही दावा कृषिमंत्र्यांनी केला.

रब्बी हंगामासाठी निधी
रशिया-युक्रेन युद्धामुळे खतांची टंचाई होऊ नये यासाठी सरकारने रब्बी हंगामासाठी २४४७५ कोटी रुपये मंजूर केले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. रब्बीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter