देशातील मुस्लिम जनतेला धार्मिक आधारावर आरक्षण देणार नसल्याच्या भाजपच्या भूमिकेवरून टीका करणाऱ्या विरोधकांना भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंह यांनी प्रत्युत्तर दिले. 'भाजप हा अजिबात मुस्लिमविरोधी पक्ष नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अनेक ३. इस्लामिक देशांनी सन्मान केला आहे,' असे राजनाथ यांनी निदर्शनास आणून दिले.
भाजपच्या भूमिकेवरून, हा पक्ष हिंदू-मुस्लीम समुदायांत फूट पाडत आहे,' असा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा आरोप आहे. बिहारमध्ये प्रचारदौ-यावर असलेल्या राजनाथसिंह यांनी एका सभेत या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदींना पाच इस्लामिक देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले आहे.
तरीही हे विरोधक आमच्यावर समुदायांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप करतात. मात्र मुस्लीम समुदायाने या आरोपांकडे - लक्ष देऊ नये. भाजप हा मुस्लिमविरोधी पक्ष नाही. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससारखे पक्ष तुमच्या डोळ्यांत धूळफेक करून तुमची मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
धार्मिक आधारावर आरक्षण हे राज्यघटनेच्या विरोधी असल्याने ते देणे शक्य नाही. मात्र, मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद असून या वर्गात जे मुस्लीम येतात, त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो."
तोंडी तलाक रद्द करण्याची भाजपची भूमिका मुस्लिमांनी जाणीव जाणून घ्यावी, असे आवाहन राजनाथसिंह यांनी केले. 'मुस्लीम बहिणी आणि मुलींवर होणारा अन्याय कोणी सहन करू शकणार नाही, निवडणुकीत काय परिणाम होईल, याचा विचार न करता आम्ही हा निर्णय घेतला,' असेही त्यांनी सांगितले.
सुरतमधील विजय हे उद्दिष्ट साध्य झाल्याचे द्योतक
"सुरत आणि इंदूर येथील भाजप उमेदवाराच्या विजयामुळे भाजपचे 'चार सौ पार'पारचे उद्दिष्ट साध्य होणार असल्याचे द्योतक आहे," असा दावा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सारण येथे गुरुवारी केला.
"मी देशभरात विविध ठिकाणो अनेक सभा घेत आहे. या प्रत्येक सभेला नागरिक मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत, त्यांचा प्रचंड पाठिंबाही मिळत आहे. लोकसभेला भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील आणि तसा प्रतिसादही मिळत आहे", असे प्रतिपादनही राजनाथसिंह यांनी केले. "पंतप्रधान मोदी यांनी शेजारील राष्ट्रांना याची जाणीव करून दिली आहे की, भारत हा आधिसारखा राहिलेला नाही. त्यामुळेच देशातील दहशतवादी कारवाया खूप कमी झाल्या आहेत" असेही राजनाथसिंह म्हणाले.
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले कि, "चारशेपेक्षा अधिका जागा मिळतील आणि याची सुरुवात सुरतपासून झालेलीच आहे. भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने लोकशाहीला बाधा आल्याचे जर विरोधकांचे म्हणणे आहे. तर देशात स्वातंत्र्यापासून २८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी २० जण काँग्रेसचे आहेत."