भारत जागतिक स्तरावर सर्वाधिक रेमिटन्स (अनिवासी भारतीयांनी देशात पाठविलेली रक्कम) प्राप्त करणारा देश ठरला आहे. या वर्षी भारतात आतापर्यंत विक्रमी १२५ अब्ज डॉलरचा रेमिटन्स आला आहे. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात आलेल्या रेमिटन्समध्ये १२.३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षों १११.२२ अब्ज डॉलरचा रेमिटन्स आला होता. एकूण देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण ३.४ टक्के होते. सर्वाधिक रेमिटन्स मिळविणाऱ्या देशांमध्ये भारतानंतर मेक्सिकोचा क्रमांक लागतो. मेक्सिकोमध्ये ६७ अब्ज डॉलर रेमिटन्स आल्प्र आहे. त्यानंतर ५० अब्ज डॉलरसह चीन तिसऱ्या स्थानावर आहे.
जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, लॉटन अमेरिका आणि कॅरिबियन देशांमध्ये रेमिटन्सची वाढ सर्वाधिक आठ टक्के होती, त्यानंतर दक्षिण आशियामध्ये ७.२ टक्के आणि पूर्व आशिया व पॅसिफिकमध्ये तीन टक्के होती. दक्षिण आशियातील एकूण रेमिटन्समध्ये सध्या भारताचा बाटा ६६ टक्के आहे. गेल्या वर्षों तो ६३ टक्के होता. अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापूरमधील भारतीयांकडून पैसे पाठविण्याचे प्रमाण वाढले असून, देशात आलेल्या एकूण रेमिटन्समध्ये या तीन देशांचा वाटा ३६ टक्के आहे. संयुक्त अरब अमिरातीमधूनही मोठ्या प्रमाणात रेमिटन्स आला आहे. भारताच्या रेमिटन्समध्ये त्याचा वाटा १८ टक्के आहे, अमेरिकेनंतर सर्वाधिक रेमिटन्स या देशांमधून येतो. गेल्या दहा वर्षात भारतातील रेमिटन्समध्ये ७८.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१३ मध्ये ते ७०.३८ अब्ज होते. त्यांनी २०२२ मध्ये १०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला, तेव्हा त्यात २४.४ टक्क्यांनी वाढून १११ अब्ज डॉलर झाले.
सीमापार व्यवहारांसाठी स्थानिक चलनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेमेंट व मेसेजिंग सिस्टीम एकमेकांशी जोडण्यासाठी फ्रेमवर्क स्थापन करण्याकरिता संयुक्त अरब अमिरातीसोबतच्या फेब्रुवारी २०२३मधील कराराचाही भारतातील रेमिटन्स वाढीला फायदा झाला, असेही जागतिक बँकेने या अहवालात म्हटले आहे. कमी आणि मध्यम उत्पत्र असलेल्या देशांमधून येणारा एकूण रेमिटन्स या वषों अंदाजे ३.८ टक्क्यांनी वाढला आहे. पुढील वर्षी तो ३.१ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता जागतिक बँकेने वर्तविली आहे. जागतिक महागाईमुळे उत्पन्नात घट होण्याची जोखीम आणि भू-राजकीय तणावामुळे स्थलांतरितांचे प्रमाण वाढल्यामुळे यात घट होण्याची शक्यता आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
घसरत चाललेली महागाई आणि उच्च उत्पन्न असलेल्या देशांमधील मजबूत कामगार बाजारपेठ हे रेमिटन्समधील वाडीत मुख्य योगदान 4D BANK 84 देणारे घटक आहेत. रेमिटन्ससाठी
येणारा कमी खर्च हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. दक्षिण आशियामध्ये २०० डॉलर पाठवण्याचा खर्च २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीतील जागतिक सरासरीच्या ६.२ टक्क्यांपेक्षा ३० टक्क्यांनी कमी होता. मलेशियाकडून भारतात रेमिटन्स पाठविण्याचा खर्च हा जगातील सर्वात स्वस्त म्हणजे केवळ १.९ टक्के आहे. सीमापार व्यवहारांसाठी स्थानिक चलनांच्या वापराचाही फायदा भारताला झाला आहे.