आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकारकडून मोठा बदल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारची अशीच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत. आयुष्मान भारत योजनेत सरकार नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात.आयुष्मान भारत योजनेत महिलांना मोफत उपचार दिले जाते.

गरीब लोकांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात. यासाठी आयुष्मान कार्ड बनवून घ्यावे लागते. या योजनेत आता ७० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही मोफत उपचार मिळणार आहे.

याआधी फक्त ७० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील उमेदवारांना आयुष्मान भारत कार्ड दिले जात होते. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. आयुष्मान भारत योजना नक्की काय आहे? या योजनेचा नागरिकांना काय फायदा होतो? याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

पात्रता
२०११ च्या जणगणनेनुसार, ज्या लोकांचा समावेश गरीब गटात होतो. त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत आजारी पडल्यास रुग्णालयात ५ लाखांपर्यंतचा क्लेम करता येतो. त्यामुळे तुमच्या उपचाराचा खर्च हा मोफत होणार आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करावा
या योजनेत नागरिकांना आयुष्मान कार्ड दिले जाते. या कार्डवर तुम्हाला ५ लाखांचा मोफत उपचार घेता येतो. यासाठी तुम्हाला pmjay.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर Am I Eligible पर्यायावर क्लिक करावे लागेल. मोबाइल नंबर टाका. त्यानंतर ओटीपी टाकावा लागेल. यानंतर तुमचे राज्य निवडावे लागेल. रेशन कार्ड नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे समजले. यानंतर आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र टाकून तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे.