राम मंदिर संकुलात बांधली जाणार आणखी १३ मंदिरे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
अयोद्धा राम मंदिर
अयोद्धा राम मंदिर

 

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत अंदाजे ११०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. संपूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी १४०० कोटी रुपये खर्च केले जातील असा आमचा अंदाज आहे. आमच्याकडे अजून ३००० कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती त्यांनी दिली.

२२ जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सर्वसामान्यांना दर्शन घेण्यासाठी मंदिर आहे. नवीन राम मंदिराच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र, नवीन राम मंदिराचे अजून बरेच काम बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसरा मजला बांधणे बाकी आहे. शिखराचे काम आणि आधीच बसवलेली शिल्पेही काही प्रमाणात पूर्ण करून पॉलिश करावी लागणार आहेत.

त्याचबरोबर राम-सीता दुसऱ्या मजल्यावर विराजमान होणार आहेत.त्यांच्यासोबत भारत, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार, स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, नवीन राम मंदिर संकुलात एकूण १३ मंदिरे बांधली जाणार आहेत. ज्यामध्ये ५ प्रमुख देवतांची (गणपती, सूर्य, शिव, विष्णू आणि देवी) मंदिरे आहेत. नवीन राममंदिर संकुलात ६ मंदिरे बांधली जातील आणि ७ मंदिरे संकुलाबाहेर बांधली जातील. हनुमानजींचे वेगळे मंदिर बांधले जाईल. सीता रसोई आहे तिथे अन्नपूर्णा मातेची स्थापना केली जाईल. तेथून सर्वसामान्यांना मंदिराचा प्रसाद मिळेल.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार, स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज यांनी पुढे बोलताना सांगितले की, आतापर्यंत मंदिरासाठी अंदाजे ११०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. संपूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी १४०० कोटी रुपये खर्च होतील जातील असा आमचा अंदाज आहे. आमच्याकडे अजून ३००० कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

परदेशातून अद्याप देणगी आलेली नाही
देशभरातून अजूनही देणग्या मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, अद्याप परदेशातून देणगी आलेली नाही, असेही ते म्हणाले. एफसीआरए सुविधेअभावी परदेशातून देणग्या घेता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २-३ महिन्यांत परदेशातूनही देणग्या येऊ लागतील, असे त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.

नवीन राम मंदिरात आयआयटीचा मोठा वाटा
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, आयआयटी रुरकी, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी सूरत, आयआयटी मुंबई, आयआयटी कानपूर आणि आयआयटीच्या तज्ञांकडून सल्ला आणि मार्गदर्शन मिळाले आहे. या संस्थांमधील तज्ज्ञांनी नेहमीच मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले. आता मंदिराच्या सुरक्षेची चिंता नाही. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपण हे काम पूर्ण करू शकलो नसतो, असे ते म्हणाले.