संयुक्त राष्ट्र मानवाधिकारचे प्रमुख वोल्कर तुर्क आणि भारताचे परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची
भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकारचे प्रमुख वोल्कर तुर्क यांच्या काश्मीर आणि मणिपुर संबंधित टिप्पण्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारताने तुर्क यांच्या या टिप्पण्या निराधार असल्याचे म्हटले आहे. स्वित्झर्लंड येथील जिनेवामधील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये बोलताना भारताचे परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अरिंदम बागची यावेळी म्हटले की, "इथे भारताचे नाव घेतले गेले. त्यामुळे मी सुरुवात करून हे सांगतो की भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. इथे एक निरोगी, चैतन्यशील आणि बहुलवादी समाज नांदतो. भारताविषयी इथे जे काही बोलले गेले ते निराधार आणि वास्तवाशी पूर्णपणे विसंगत आहेत."
बागची पुढे म्हणाले, "भारतीय नागरिकांनी वारंवार अशा निराधार गोष्टी चुकीच्या सिद्ध केल्या आहेत. आम्ही जगाला भारताची विविधता, संस्कृती आणि सभ्यतेच्या नीतिमत्तेबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आग्रह धरतो."
जम्मू आणि कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याचा उल्लेख करत बागची म्हणाले, "इथे जम्मू आणि काश्मीरचा चुकून काश्मीर म्हणून उल्लेख केला गेला, त्यावर मी काही स्पष्टीकरण देणार नाही. पण गंमत म्हणजे त्या प्रदेशाची शांतता आणि सर्वसमावेशक प्रगती जय वर्षी झाली तेव्हाच त्याठिकाणच्या प्रादेशिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान, वाढलेले पर्यटन असो किंवा वेगवान विकासाचा झाला आहे.
मानवाधिकार परिषदेच्या सत्रादरम्यान संयुक्त राष्ट्र मानवाधिकारचे प्रमुख वोल्कर तुर्क यांनी मणिपुर आणि काश्मीरमधील परिस्थितीवर टिप्पणी केली होती मणिपुरमधील हिंसा आणि विस्थापन थांबवण्यासाठी संवाद, शांतता आणि मानवाधिकारांच्या आधारावर अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.