भारतातील निवडणुकांबाबत अपप्रचार केल्याबद्दल 'मेटा 'विरुद्ध कारवाईचा इशारा दूरसंचार व माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संसदीय स्थायी समितीकडून देण्यात आला आहे. चुकीची माहिती पसरविल्याबद्दल 'मेटा'ने माफी मागावी, अशी मागणी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी केली आहे. तसेच समितीतर्फे 'मेटा'ला पाचारण करण्याचे संकेतही त्यांच्याकडून देण्यात आले आहेत.
'मेटा'चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये २०२४ मधील निवडणुकांचा दाखला देताना भारतासह अनेक देशांमध्ये सत्ताधाऱ्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले असल्याचा दावा केला होता. दुबे यांनी 'मेटा'ने चुकीची माहिती पसरविल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. आपली समिती (संसदीय स्थायी समिती) 'मेटा'ला या चुकीच्या माहितीसाठी विचारणा करेल. कोणत्याही लोकशाही देशात चुकीची माहिती पसरविल्यास देशाची प्रतिमा मलिन होते त्यामुळे 'मेटा'ने भारतीय संसद आणि जनतेची माफी मागितली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, झुकरबर्ग यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांना खरमरीत शब्दांत फटकारले होते.
मोदींवर जनतेचा विश्वास : वैष्णव
मंत्री वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टद्वान भारतातील निवडणुकांबाबत वस्तुस्थित स्पष्ट केली. "भारताने २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकांचे यशस्व आयोजन केले होते त्यात ६४ कोटींपेक्ष अधिक मतदारांनी सहभाग नोंदविल होता. देशातील जनतेने पुन्हा एकद पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर विश्वास दाखविला आणि सलग तिसऱ्यांदा त्यांन सत्तेवर बसविले. कोरोनानंतर भारतात सत्ताधाऱ्यांना पराभवाचा सामना कराव लागला हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे,' अशा शब्दांत त्यांनी झुकरबर्ग यांचे विधान खोडून काढले. 'मेटा'ने आपल्य विश्वासार्हतेला जपण्यासाठी तथ्यांवर आधारित माहिती दिली पाहिजे असेह त्यांनी म्हटले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter