२०४७पर्यंत देशाला करणार नशामुक्त - गृहमंत्री शहा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

"तरुणांना व्यसनाधीन बनविणाऱ्या अमलीपदार्थ तस्काविरुद्ध कठोर कारवाईसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आपला देश २०४७ पर्यंत नशामुक्त होईल," " असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. सोशल मीडिया 'एक्स'वरील पोस्टद्वारे अमित शहा यांनी अमलीपदार्थाविरुद्धची सरकारची भूमिका स्पष्ट केली. 

या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की,"देश अमलीपदार्थमुक्त बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार वचनबद्ध आहे. खालून वरपर्यंत आणि वरपासून खालीपर्यंत अशा दुहेरी रणनीतीचा वापर करत तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईमुळे अमलीपदार्थांच्या २९ तस्करांना देशभरातील बारा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने दोषी ठरवले आहे. ही सर्व प्रकरणे अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाच्या अहमदाबाद, भोपाळ (मंदसौर), चंडीगड, कोचीन, डेहराडून, दिल्ली, हैदराबाद, इंदूर, कोलकाता आणि लखनौ या विभागांमधील होती.
 
मोदी सरकारच्या शून्य सहिष्णुता धोरणाचा पाठपुरावा करताना अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने हे महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे." या आरोपपत्रांमुळे अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाने समर्पित वृत्तीने काम केल्याचे स्पष्ट होते, असेही शहा म्हणाले. 

दरम्यान, अमलीपदार्थांविरुद्धच्या लढाईत अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाला तस्करीबाबतची माहिती गोपनीयरित्या दिली जाऊ शकते, असे गृह मंत्रालयातर्फे कळविण्यात आले आहे.