दिल्लीत भारत-अमेरिका सुरक्षा सल्लागारांची महत्वाची बैठक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
 अजित डोवाल आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिव्हन
अजित डोवाल आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिव्हन

 

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ६ जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिव्हन यांची नवी दिल्ली मध्ये भेट घेतली. ही बैठक सलिव्हन यांच्यासोबत उच्चस्तरीय अमेरिकी शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक शिष्टमंडळही होती.

या भेटीमुळे भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये उच्चस्तरीय संवाद झाला. या संवादात द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली.तसेच आतंकवादविरोधी कारवाई आणि आर्थिक सहकार्य याबद्दल देखील चर्चा झाली. या बैठकीत चीन आणि अफगाणिस्तानच्या परिस्थितीवरही विचार विनिमय करण्यात आले.

महत्वाचे म्हणजे जेक सुलिव्हन यांनी भारताच्या सुरक्षा धोक्यांविषयी चिंता व्यक्त केली असून, अमेरिका भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपल्या पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. याशिवाय दोन्ही देशांच्या मध्यवर्ती लष्करी सहकार्याचे महत्त्व देखील या चर्चेत अधोरेखित केले गेले.

भारत आणि अमेरिकेचे संबंध गेल्या काही वर्षांमध्ये आणखी दृढ झाले आहेत आणि या बैठकीने परस्परातील सहकार्याला आणखी वेग दिला आहे. या बैठकीला दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे, विशेषतः सध्याच्या जागतिक वातावरणासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे. 

ICET उपक्रमावर चर्चा
दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी उचलण्यात आलेले सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे भारत-अमेरिका इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (ICET). दोन्ही देशांमधील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक प्रगती व्हावी या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिडेन यांनी २०२२ मध्ये ICET लाँच केले होते.