उत्तर प्रदेशातील झाशीत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये आग लागल्याने दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु वार्डमध्ये भीषण आग लागल्याने या मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या वार्डमधील इतर नवजात बालकांना खिडकी तोडून वाचवण्यात यश आलं आहे.
शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वॉर्डात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेव दुःख व्यक्त करत ताबडतोब चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधील नवजात शिशु वार्डमध्ये भीषण आग लागली. या आगीमुळे या वार्डमधील दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर १६ जखमी झाले आहेत. यातील ३७ बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात आलं आहे. तर ही आग शॉर्ट सक्रिटमुळे लागल्याचं सांगितलं जात आहे.
आगीची घटना घडताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. मुलांचे पालक आक्रोश करत बाळांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान, अग्निशामन दलाने ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढलं आहे. तर ही दुर्घटना घडली त्यावेळी या वार्डमध्ये ५४ नवजात बालके होती.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter