दोन लाख अत्तर बाटल्या विक्रीचा अंदाजमालेगावमुस्लीम बांधव रमजान पर्वात नवीन कपड्यांबरोबर अत्तर, सुरमा खरेदी करतात. येथे अत्तराचे शेकडो प्रकार आहेत. यात सौम्य तसेच उग्र अत्तराची विक्री होते. रमजानमध्ये अत्तराचा छोट्या दोन लाखापेक्षा अधिक बॉटल विक्रीचा व्यवसायीकांचा अंदाज आहे.
रमजानमध्ये अत्तर विक्रीतून लाखोंची उलाढाल बघायला मिळते. येथे २० ते २५ अत्तर मिळते. अत्तरामध्ये काही व्यापाऱ्यांनी स्वत:चा ब्रॅन्ड तयार केला आहे. अत्तर व परफ्युममध्ये विविध प्रकारचे सुगंधित अत्तर बाजारात आहेत. अभिनेता व सेलीब्रिटी ब्रॅण्डच्या अत्तराची क्रेझ तरुणाईत वाढली आहे. शंभर ते पाच हजार प्रतितोळा अत्तराची विक्री होते.रमजान पर्वात ईदच्या नमाज पठणापूर्वी प्रत्येक मुस्लीम बांधव अत्तराचा वापर करतात. त्यामुळे येथे रमजानपर्वात दोन लाखापेक्षा अधिक अत्तराच्या छोट्या बाटल्यांची विक्री होणार असल्याचे व्यापारी सांगतात.
मालेगाव शहर हे मुंबईनंतर सर्वात मोठे अत्तराचे केंद्र आहे. येथून उत्तर महाराष्ट्रासह राज्यभर अत्तर विक्रीला जाते.काही व्यापारी स्वत: अत्तर तयार करतात. येथील अत्तर तमिळनाडू, हैदराबाद, हिमाचल प्रदेश, मेघालय, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश यासह अनेक ठिकाणी अत्तर पाठवितात. शहरात दुबई, सौदी, विविध देशातील अत्तर विक्रीसाठी येतात. ३० ते १०० रुपयापर्यंत अत्तराची विक्री होते. दर शुक्रवारी प्रत्येक मशिदीबाहेर ५ ते १० रुपयात अत्तराचे बोळे विक्री होते.
रमजानमध्ये अत्तराच्या विक्रीत दुपटीने वाढ होते. येथे अत्तर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी नेहमी असते. अत्तरला नेहमी पसंती दिली जाते. महिलाही अत्तराचा वापर करताना दिसतात. नाशिक जिल्ह्यातील अनेक नागरिक अत्तर खरेदीसाठी मालेगावला येतात.
- खिजील अहमद
(एस. ए. अत्तरवाला, मालेगाव)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -