बांगलादेशी क्रिकेटपटू लिटन दासच्या घरी गणपतीचे आगमन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 8 d ago
लिटन दासच्या घरी जल्लोषात गणेशोत्सव साजरा
लिटन दासच्या घरी जल्लोषात गणेशोत्सव साजरा

 

भारतात सध्या गणेशोत्सव सुरू आहे. भारतातील ठिकठिकणी मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जात आहे. अनेक खेळाडूंच्या घरीही बाप्पा विराजमान झालाय. इतकंच नाही, तर बांगलादेश क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टिरक्षक लिटन दास याच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे.

लिटनने आपल्या परिवारासोबत बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. लिटन कुमार दास याचा जन्म बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यातील एका बंगाली हिंदू कुटुंबात झाला. त्याला दोन भाऊ आहेत. लिटन आपल्या बांगलादेशातील घरी कुटुंबासोबत हिंदू संस्कृतीनुसार गणेशोत्सव साजरा करत आहे.

लिटनने जून २०१५ मध्ये बांगलादेशसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने बांगलादेशसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (१७६) केली आहे. लिटनने बांगलादेशसाठी एकूण ४३ कसोटी, ९१ वन-डे आणि ८९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.

नुकत्याच झालेल्या बांगलादेश - पाकिस्तान कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात लिटनने ७८ चेंडूमध्ये ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली, तर दुसऱ्या सामन्यात लिटनने २२८ चेंडूमध्ये १३८ धावांची शतकीय खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १३ चौकरांसह ४ षटकार ठोकले. बांगलादेशच्या पाकिस्तानविरुद्ध मिळलेल्या कसोटी मालिकेतील विजयामध्ये लिटनचे मोलाचे योगदान आहे. बांगलादेशने नुकतेच पाकिस्तानला त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिकेत २-० अशा फरकाने पराभूत केले.

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर बांगलादेश संघ १९ सप्टेंबर पासून २ कसोटी आणि आणि ३ ट्वेंटी - २० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.