जगभरात उत्साहाने 'असा' साजरा झाला नाताळ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 15 h ago
व्हॅटिकन सिटी: नाताळनिमित्त ख्रिस्ती समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी बुधवारी सेंट पीटर्स बेसिलिकाचे 'पवित्र द्वार' उघडले. हे दार दर २५ वर्षांनी उघडले जाते आणि नंतर वर्षभर व्हॅटिकन सिटीमध्ये आनंदोत्सव साजरा केला जातो
व्हॅटिकन सिटी: नाताळनिमित्त ख्रिस्ती समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी बुधवारी सेंट पीटर्स बेसिलिकाचे 'पवित्र द्वार' उघडले. हे दार दर २५ वर्षांनी उघडले जाते आणि नंतर वर्षभर व्हॅटिकन सिटीमध्ये आनंदोत्सव साजरा केला जातो

 

प्रभू येशूच्या जन्मदिवसानिमित्त जगभरात आज नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये सणानिमित्त सर्व बाजारपेठा, रस्ते, घरे सजली असून सार्वजनिक ठिकाणीही सजावट करण्यात आली आहे. हा सुटीचा काळ असल्याने अनेकांनी प्रवासाचे नियोजन केले असल्याने पर्यटन क्षेत्रातही अब्जावधी डॉलरची उलाढाल होत आहे. तसेच, या सणानिमित्त एकमेकांना भेटवस्तू देण्याचीही अनेक देशांमध्ये पद्धत असल्याने बाजारपेठांमध्येही व्यवहार वाढले आहेत.

नाताळ हा ख्रिस्तीधर्मियांचा सर्वांत मोठा सण असल्याने जगभरातील ख्रिस्ती नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भारतात ख्रिस्ती समुदायाबरोबरच इतर धर्मीय नागरिकहो या सणात आनंदाने सहभागी होतात. त्यामुळे भारतातही मोठ्या शहरांमध्ये रोषणाई झाली होती. पणजी, मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमधील चर्चमध्ये ख्रिस्ती नागरिकांनी प्रार्थनेसाठी गदर्दी केली होती. तसेच, अनेक ठिकाणी आतषबाजी करत प्रभू येशूच्या जन्मदिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. शाळांना सुटी असल्याने पर्यटनस्थळेही गजबजली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह देशातील प्रमुख राजकीय नेत्यांनी नाताळनिमित जनतेला शुभेच्छा दिल्या.

अब्जावधी डॉलरची उलाढाल
नाताळच्या सुट्यांमध्ये जगभरातील अनेक जण पर्यटनाला जात असल्याने आणि खरेदीचे प्रमाणही मोठे असल्याने पर्यटन क्षेत्रासह विविध बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल होत असते. यंदाही पर्यटकांची संख्या मोठी असल्याचे काही सर्वेक्षण संस्थांनी सांगितले आहे. या क्षेत्रातील उलाढालीचा निश्चित अंदाज आला नसला तरी केवळ अमेरिकेत किमान ७०० अब्ज डॉलरपर्यंत उलाढाल होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, एकमेकांना भेटवस्तू देण्याच्या प्रमाणातही पाच टक्क्यांनी वाढ झाली असल्याने नाताळनिमित्त अमेरिकेत किमान ९३६ अब्ज डॉलरची, तर जगभरात किमान दोन हजार अब्ज डॉलरची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

प्रभू येशूचे जन्मगाव सुनेसुने...
बेथलहेम: ज्या प्रभू येशूच्या जन्मदिनानिमित्त जगभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि ज्याने सर्वांना प्रेमाचा आणि शांततेचा संदेश दिला, त्याच्या जन्मगावी मात्र युद्धामुळे सुनेसुने वातावरण आहे. इस्राईलला लागून असलेल्या पश्चिम किनारपट्टीमधील बेथलहेम गावातील 'चर्च ऑफ नेटिव्हीटी हे प्रभु येशूचे जन्मठिकाण समजले जाते. एरवी येथे पर्यटकांची रीघ लागलेली असते. मात्र, इसाईल आणि हमास युद्धामुळे या गावात ऐन नाताळच्या दिवशीही उत्साहाचे वातावरण दिसलेले नाही, प्रवासनिर्वधांमुळे कोणीही विदेशी पर्यटक आले नसल्याने येथील लोकांचा रोजगार बुडाला आहे

व्हॅटिकन सिटीमध्ये विशेष कार्यक्रम
कैथोलिक पंथियांचे मुख्यस्थान मानल्या गेलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये नाताळच्या सणानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाताळनिमित्त ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी 'सेंट पीटर्स बेसिलिकाचे पवित्र हार' उपडून उत्सवाला सुरुवात करून दिली. हे दार २५ वर्षांनी उघडले जात आणि नंतर वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दारातून प्रवेश केल्यास परमेश्वराकडून क्षमा मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.