अकबर आणि प्रयागराज : धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
इलाहाबाद किल्ल्यामध्ये असलेला अक्षयवट
इलाहाबाद किल्ल्यामध्ये असलेला अक्षयवट

 

उत्तर प्रदेशातील प्रयागराजला पूर्वी इलाहाबाद म्हणून ओळखले जायचे. हे शहर भारताचा एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे. तसेच हे शहर महाकुंभ मेळ्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. याठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम झाला आहे. त्यामुळे हिंदूंसाठी अत्यंत पवित्र ठिकाण मानले जाते. याठिकाणी लाखो तीर्थयात्री स्नान करण्यासाठी येतात. असे मानले जाते की जाते की या संगमातील स्नानामुळे पापांपासून मुक्ति मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो.

महाकुंभ मेळ्यादरम्यान तीर्थयात्री इलाहाबाद किल्ल्यामध्ये असलेल्या अक्षयवट या झाडाची पूजा करण्यासाठी जात असतात. अक्षयवटला हिंदू धर्मात अमर वृक्ष मानले जाते. असे म्हटले जाते की त्याठिकाणी मोक्ष प्राप्तीसाठी आत्मसमर्पण करण्याची परंपरा होती. हे अक्षयवट मुघल सम्राट जलालुद्दीन मुहम्मद अकबरने बांधलेल्या किल्ल्यात टुमदारपणे आहे. संगमाच्या ठिकाणी असलेला किल्ला आणि अक्षयवटाचा इतिहास अनेक रोचक पैलूंशी जोडलेला आहे.

अकबरचे योगदान आणि किल्ल्याचे रहस्य
अकबरने १५६३ मध्ये प्रयागराज (तत्कालीन इलाहाबाद) मध्ये तीर्थयात्र्यांवर लावलेले कर संपवले होते. त्यानंतर १५८४ मध्ये अकबरने येथे एक भव्य किल्ला बांधला. हा किल्ला संगमाच्या किनाऱ्यावर स्थित असून किल्ल्यात असलेला अक्षयवट हिंदूंसाठी एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. परंतु असे अनेक प्रश्न उभे राहतात की एका मुस्लिम सम्राटाने एक पवित्र हिंदू प्रार्थना स्थळाची रक्षा का केली आणि त्याच्या चारही बाजूंनी किल्ला का बांधला?

इथे विचार करण्यासारखी बाब आहे की एका मुस्लिम सम्राटाने हिंदूंचे पवित्र स्थळ नष्ट न करता त्याची रक्षा केली. अकबरानंतरच्या मुघल आणि ब्रिटिश शासकांसाठी हे एक रहस्य बनले की अकबरने या पवित्र झाडाच्या चारही बाजूंनी किल्ला का बांधला असावा. स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की आज त्याठिकाणच्या जो अक्षयवट दिसतो तो खरा नसून, खरा वृक्ष इतर ठिकाणी आहे. परंतु तरीही अकबराने केलेले हे कार्य इतिहासकार आणि शासकांसाठी एक मोठे आश्चर्य ठरले.
 

अकबर आणि हिंदू धर्म
अकबराच्या जीवन आणि त्याने केलेल्या कार्यांबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्या कथा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून खूप रोचक आहेत. हिंदू धर्मात देखील एक अशीच दंतकथा प्रसिद्ध आहे, असे म्हटले जाते की अकबराने आपल्या पूर्व जन्मात हिंदू ब्राह्मण म्हणून जन्म घेतला होता.
 
बाबू भोलानाथ चंद्र यांनी १८६९ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘द ट्रॅवल्स ऑफ ए हिंदू’ या पुस्तकात या दंतकथेचा उल्लेख आहे. त्या पुस्तकात असे म्हटले आहे की, अकबराचे पूर्व जन्मातील नाव मुकुंद होते आणि तो एक धर्मनिष्ठ ब्राह्मण होता.

दंतकथेनुसार, मुकुंदाने देवतांकडून सम्राट होण्यासाठी एक विशेष तपस्या केली होती. देवतांनी त्याला सांगितले की सम्राट होण्यासाठी त्याला प्रथम मरण पावून पुनर्जन्म घ्यावा लागेल. मुकुंदाने आपली तपस्या पूर्ण केली आणि मृत्यूनंतर पुनर्जन्म घेऊन अकबर म्हणून जन्म घेतला. म्हणूनच अकबरच्या जीवनात हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरांविषयी श्रद्धा आणि आदर दिसून येतो.

अकबर आणि हिंदू संस्कृती
अकबराचे दरबार हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचे मिश्रण होते. अकबराची पत्नी जोधाबाई ही एक हिंदू राजकुमारी होती आणि त्याच्या दरबारात अनेक प्रमुख हिंदू व्यक्तिमत्त्वं देखील होती. जसे की राजा मान सिंग, राजा टोडर मल, बीरबल आणि तानसेन ही अकबराच्या दरबारातील प्रमुख व्यक्ती. अकबरने नेहमीच हिंदू कल्याणासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. हिंदू मंदिरांचा पुर्ननिर्माण, हिंदू धर्माबद्दल त्याची श्रद्धा आणि हिंदू संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासारख्या गोष्टी अकबराने त्याच्या कार्यकाळात केल्या आहेत.

असेही म्हटले जाते की अकबराने आपल्या पूर्व जन्मातील कार्यांना आठवून प्रयागराजमध्ये एक पितळी प्लेट गाडली होती, ज्यावर त्याने आपल्या पूर्व जीवनातील घटनांची मांडणी केली होती. कालांतराने ही प्लेट आणि इतर संकेत अकबरला त्याच्या पूर्व जन्माशी संबंधित आठवणी म्हणून मिळाल्या, ज्यामुळे हे सिद्ध झाले की तो खरंच एक हिंदू ब्राह्मण म्हणून जन्माला आला होता.

संमिश्र संस्कृतीचे प्रतीक
अकबरचा किल्ला आणि अक्षयवट आजही भारताच्या संमिश्र संस्कृतीचे प्रतीक बनेले आहे. हा किल्ला फक्त ऐतिहासिकच नाही तर, भारतात असलेले विविध धर्म आणि संस्कृतींना जोडणारा एक अनमोल इतिहास आहे.

अकबरची धोरणे आणि कार्यांनी हे दाखवून दिले आहे की, त्याने धार्मिक सहिष्णुतेला प्रोत्साहन दिले आणि भारताच्या विविधतेत एकतेचा संदेश दिला. अखेर प्रयागराजचा हा किल्ला, अक्षयवट आणि महाकुंभ यांसारख्या धार्मिक स्थळांचे महत्त्व फक्त हिंदू धर्मासाठीच नाही, तर ते भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या मिश्रणाचे प्रतीक बनले आहेत.

अकबराच्या कार्यांनी आणि विचारांनी या भूमीवर छाप सोडली आहे. समर्पण, आदर आणि सहिष्णुतेचा मार्गच सत्याच्या दिशेने नेतो, हे यातून दिसून येते.

- साकिब सलीम
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter