'ही' ५०हून अधिक औषधे आहेत निकृष्ट दर्जाची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 3 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

तुम्ही जी औषधं डोळे झाकून खाता, ती औषधं जीवघेणी ठरू शकतात. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DGCI ने औषधांच्या तपासणीमध्ये ५० औषधं निकृष्ट दर्जाची असल्याचं म्हटलं आहे. या सगळ्या मेडिसिन्स देशातल्या अनेक ठिकाणांवर विक्री होत आहेत आणि लोक हेच निकृष्ट ओषधं सर्रासपणे घेत आहेत.

तपासणीमध्ये निकृष्ट दर्जाची जी औषधं सापडली आहेत, त्यामध्ये पॅरासिटॅमॉल 500, बीपीचं टेल्मीसारटन, कफटीन कफ सीरप, क्लोनाजेपेम, डिक्लोफेनेक, मल्टिविटॅमिन आणि कॅल्शियमच्या गोळ्यांच्या समावेश आहे.

निकृष्ट दर्जाची अशी ५० औषधं आहेत, ज्यांचा वापर देशातले लाखो लोक करतात. अनेक लोक ताप आल्यानंतर स्वतःच पॅरासिटॅमॉल खातात. या गोळ्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत, असं डीजीसीआयने म्हटलं आहे.

मिंटच्या वृत्तानुसार, डीजीसीआयने आपल्या रिसर्चमध्ये केसांना लावण्यात येणारी हीना मेहंदी घातक असल्याचं म्हटलं आहे. कॉस्मेटिक कॅटॅगिरीमध्ये समावेश असलेल्या हीना मेहंदीची गुणवत्ता ढासळलेली असल्याचं तपासामध्ये पुढे आलेलं आहे.

भारतातल्या कफ सीरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना परदेशात घडलेल्या आहेत. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार या औषधांचे सॅम्पल घेण्यात आलेले होते. गुजरातमधलं वाघोडिया, हिमाचल प्रदेशातले सोलन, राजस्थानमधलं जयपूर, उत्तराखंड येथील हरिद्वार, हरियाणातलं अंबाला, आंध्र प्रदेशातलं हैदराबाद या ठिकाणांसह देशातल्या अनेक भागांमधून सॅम्पल घेण्यात आलेलं होतं.

'या' औषधांचाही समावेश
कॉन्सिटपेशनसाठी वापरण्यात येणारं लेक्टोलूज सॉल्यूशन, ब्लड प्रेशरसाठी घेण्यात येणारं टेलमिसाटन आणि अम्लोडिपाईन, ऑटो इम्यून डिसीससाठी डेक्सामेथासोन, सोडियम फॉस्फेट, गंभीर इन्फेक्शनसाठी वापरण्यात येणारं क्लोनाजेपाम टॅब्लेट, यांचा समावेश आहे. 'न्यूज 18 हिंदी'ने हे वृत्त दिले आहे.