कोविडपासून जन्मदरात झालीये 'इतकी' घट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 16 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

कोविडचे संकट, मुले जन्माला घालण्याबाबत जोडप्यांचा बदललेला दृष्टिकोन, कारकीर्द घडविण्यास प्राधान्य (करिअर), मुलांच्या जन्माच्या वेळी होणारा मोठा वैद्यकीय खर्च व पुढे जाऊन घ्यावे लागणारे महागडे शिक्षण, अशा कारणांमुळे जन्मदरच घटल्याचे दिसून येते.

प्रामुख्याने कोविहनंतर मुले जन्माला घालण्याचे प्रमाण घटल्याची माहिती राज्ज्ञ देतात, पुणे शहरात गेल्या १३ वर्षांत जन्माला आलेल्या वालकांची आकडेवारी याचे प्रमाण आहे. २०११ पासून दरवर्षी ५३ ते ६० हजार बालके जन्मल्याची नोंद आहे. यात २०१५ ते २०१८ या काळात वार्षिक संख्या ६० हजारांहून जास्त आहे. २०२० पासून मात्र ही आकडेवारी ५० हजारांच्या खाली गेली आहे. आधीच्या चार ते पाच वर्षांच्या तुलनेत वार्षिक घट चार ते १२ हजारांची असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी दिली. 

याविषयी बोलताना ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ  डॉ. रमेश भोसले म्हणतात, “जन्माबाबतची आकडेवारी अचूक असेल तर मुलांना जन्माला घालण्याबाबत ही कारणे असू शकतात. अलीकडची पिढी कारकिर्दीला प्राधान्य देत असत्याने मुळातच विवाह उशिरा होतात. वाढलेल्या वयातील गर्भधारणेमुळे येणाऱ्या समस्या, आर्थिक नियोजन, संगोपनाचा वाढलेला खर्च आदी कारणेसुद्धा यास कारणीभूत असू शकतात.” 

कोविड काळातील भीती
कोविड काळात स्णालयात जावे लागले तर महिला व नंतर कदाचित बालकांना संसर्ग होण्याच्या भीतीने अनेक जोडप्यांनी संततीचे नियोजन पुढे ढकलल्याची माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ देतात. त्याचा परिणाम २०२० पासून दिसतो आहे. हेच चित्र कायम आहे. 

प्रत्येक घटकावर परिणाम 
आरोग्य हक्क कार्यकर्ते विनोद शेंडे यांनी सांगितले की, कोविडमध्ये आरोग्य सेवांमधील मर्यादांचा अनुभव लोकांना आला, एकीकडे सरकारी सुविधा अपुऱ्या आहेत. ज्या आहेत त्यासुद्धा ढासळल्या आहेत. दुसरीकडे खासगी आरोग्यसेवा अत्यंत महाग झाली आहे. अनेकदा परिस्थितीनुसार हे दर नियंत्रणाबाहेर जातात. सध्या साधे आजार, गरोदरपणातील उपचार, चाळंतपण यासोबतच पुढील काळात आरोग्यासाठी होणारा खर्च असे काहीच सामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे अपत्य जन्माला घालताना विचार करणे भाग असते. कुटुंबातील सदस्यांना योग्य आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात मिळतील का, उपचार घेता येतील का असे असंख्य प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत. एकूणच आर्थिक अनिश्चिततेचा परिणाम प्रत्येक कौटुंबिक आणि सामाजिक घटकावर झालेला दिसतो.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter