आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सबाबत राज्यांना केल्या 'या' मार्गदर्शक सूचना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 7 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मंकीपॉक्स जगभरात वेगागाने पसरत असून डब्ल्यूएचओनेही जागतीक आरोग्य आणीबाणी घोषित केलीय. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने नुकताच मंकीपॉक्स आजारासंदर्भात मार्गदर्शक सूचना आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान मंकीपॉक्सच्या उद्रेकामुळे जागतिक आरोग्य आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर, लाखो जीव धोक्यात येऊ शकतात. या भयानक आजारापासून वाचवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी मंकीपॉक्सवरील लस तयार करण्याचं काम सुरू केलंय.

मार्गदर्शक सूचना
  • मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण करावे.
  • सर्व राज्य सरकारांनी नागरिकांमध्ये मंकी पॉक्सविषयी जागरूकता वाढवावी.
  • मंकी पॉक्सविषयीची माहिती, संसर्गाची माध्यमे याविषयी लोकांना जागरूक करावे.
  • प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य आणि जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेची समीक्षा करावी.
  • रुग्णालयात मंकी पॉक्सचे रुग्ण तसेच संशयित यांच्या विलगीकरणाराच्या, यातायात सुविधा आहेत का, याची खातरजमा करावी
  • संशयित रुग्णांचे नमुने विहित प्रयोगशाळांना पाठवण्यात यावेत तसेच पॉजिटीव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे नमुने ICMR ला जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जावेत.
  • सध्या देशभरात ३६ प्रयोगशाळा व ३ PCR किट्सना तपासणीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
 
मंकीपॉक्स म्हणजे नेमकं काय?
मंकीपॉक्स या विषाणूने अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातलाय. भारताच्या शेजारी असलेला देश पाकिस्तानमध्ये सुद्धा मंकीपॉक्स व्हायरसने शिरकाव केलाय. विविध देशांतील एकंदर परिस्थिती पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलंय. दरम्यान हा आजार झाल्याचं कसं ओळखायचं? तसेच यावर काय उपाय करावेत? या सर्वच प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊ.

मंकीपॉक्स म्हणजे विषाणूजन्य झुनोटिक रोग किंवा आजार होय. या आजारामुळे शरीरावर पुरळांसारखी लक्षणे जाणवतात. या आधी झालेल्या संशोधनादरम्यान मंकीपॉक्स विषाणू १९५८ मध्ये माकडांच्या वसाहतीत पहिल्यांदा आढळला होता. ज्या व्यक्तींना मंकीपॉक्सची लागण होते, त्यांना सतत ताप येणे, डोके दुखी, प्रचंड अशक्तपाणा जाणवत असतो. तसेच महत्वाचे म्हणजे कांजण्यांप्रमाणे अंगावर बारीक पुरळ उठतात. दोन ते चार आठवड्यांनंतर ही लक्षणे तीव्र होतात.