मधुमेह, हृदयविकार यासांरख्या अनेक आजारांवरील ४१ औषधे होणार स्वस्त

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 7 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतातील काही महत्वपूर्ण आजारांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किंमतींमध्ये दिलासा देण्याचा निर्णय भारत सरकारने नुकताच घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने ४१ औषधांच्या आणि ६ फॉर्म्युलेशनच्या किंमती निश्चित केल्या आहेत.

त्यानंतर, मधुमेह, अंगदुखी, हृदय, यकृत, अँटासिड, अ‍ॅलर्जी, मल्टिव्हिटॅमिन, अँटीबायोटिक्स इत्यादी किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत.  ज्यामुळे, आता नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या किंमती निश्चित केल्यामुळे ४१ औषधे स्वस्त होणार आहेत. यामुळे, तुम्हाला या सगळ्या आजारांवरील औषधांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

NPPA च्या बैठकीत घेण्यात आला महत्वपूर्ण निर्णय
औषधांच्या किंमतींमध्ये दिलासा देण्याचा निर्णय हा नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या १४३ व्या (NPPA) बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठी राजपत्रित अधिसूचना (Gazette Notification) जारी करण्यात आली आहे. दरम्यान, NPPA ही एक सरकारी नियामक संस्था असून जी भारतातील फार्मास्युटिकल औषधांच्या किंमती नियंत्रित करण्याचे काम करते.