केंद्र सरकारने १० ऑक्टोबर २०२२ला ‘राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम’ची (NTMHP) सुरू केली. हा कार्यक्रम जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाची शाखा म्हणून काम करतो. याचा उद्देश २४ तास टेली मानसिक आरोग्य सल्ला सुलभ आणि परवडणारी सेवा प्रदान करेन. यासाठी, देशभरात एक टोल-फ्री क्रमांक (१४४१६) लागू करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे
-
देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात २४ तास टेलि-मानसिक आरोग्य सुविधा स्थापन करणे. या माध्यमातून प्रत्येकापर्यंत मानसिक आरोग्य सेवा वेगाने पोहचवण्यासाठी प्रयत्न करणे.
-
समुपदेशनाव्यतिरिक्त, एकात्मिक वैद्यकीय आणि मानसिक-सामाजिक हस्तक्षेप प्रदान करणारे संपूर्ण मानसिक आरोग्य सेवा नेटवर्क अंमलात आणणे.
-
शासकीय योजनेपासून वंचित असणाऱ्या लोकांपर्यंत सेवा पोहचवणे.
देशातील ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ५३ टेली मनास सेल्सची स्थापना केली आहे. यामध्ये २० भाषांमध्ये सेवा उपलब्ध आहेत. यामाध्यमातून ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत १८,१३,००० पेक्षा अधिक कॉल्स हेल्पलाइनवर हाताळले गेले आहेत. २०२२-२३ मध्ये १२०.९८ कोटी, २०२३-२४ मध्ये १३३.७३ कोटी आणि २०२४-२५ मध्ये ९० कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
१० ऑक्टोबर २०२४ ला ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ निम्मित्त सरकारने टेली मनास मोबाइल अॅप्लिकेशन लाँच केले. हे अॅप्लिकेशन मानसिक आरोग्याच्या विविध समस्यांसाठी सेवा देणारे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
सरकारने पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC) येथे एक विशेष टेली-मानसिक आरोग्य केंद्र स्थापित केले आहे. या केंद्रातून सशस्त्र दलातील सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आरोग्य सहाय्यता आणि सेवा पुरवते. १.७३ लाखांपेक्षा जास्त आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये मानसिक आरोग्य सेवांचा समावेश करण्यात आला आहे. या सेवांचे संकलन सामान्य आरोग्य सेवा पॅकेजमध्ये केले गेले आहे.
राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत ७६७ जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (DMHP) कार्यान्वित केला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत मानसिक विकारांचे निदान, व्यवस्थापन आणि उपचार प्रदान केले जातात. समुपदेशन, कौन्सलिंग, औषधोपचार, आणि विविध सेवांचा समावेश केला जातो.
राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या तज्ञांची संख्या वाढवण्यासाठी सरकारने २५ उत्कृष्टता केंद्रांची स्थापना केली आहे. या केंद्रांमुळे मानसिक आरोग्य तज्ञांंना पीजी अभ्यासक्रमासाठी प्रवेश वाढवता येईल आणि तिसऱ्या स्तरावर उपचार सेवाही उपलब्ध होतील. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने MD (सायकोलॉजी) अभ्यासक्रमांच्या अंतर्गत सीटांची संख्या वाढवण्यासाठी १५ जानेवारी २०२४ ला ‘PGMSR-2023’ नियमावली प्रकाशित केली आहे.
सरकारने डिजिटल अकॅडेमीजची स्थापना केली आहे. ज्यामध्ये विविध प्रकारच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाते. हे अकॅडेमीज २०१८ पासून तीन केंद्रीय मानसिक आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि तंत्रज्ञान संस्थे, बेंगलुरू, लोकप्रिय गोपीनाथ बोरडोलोई संस्थान, तेझपूर, आणि सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ सायकीयाट्री, रांची ही ठिकाणे आहेत. सध्या ४२,४८८ मानसिक आरोग्य तज्ञांना या अकॅडेमीजद्वारे प्रशिक्षण दिले गेले आहे.
सरकारने मानसिक आरोग्य क्षेत्रातील जागरूकतेला आणि सेवा उपलब्धतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पायाभूत सुविधांची स्थापना केली आहे. टेली मानसिक आरोग्य सेवा आणि मानसिक आरोग्य तज्ञांची संख्या वाढवण्याच्या योजनेमुळे देशभरात मानसिक आरोग्याचे स्तर सुधारण्यास मदत होईल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत बोलताना ही माहिती दिली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter