जगात सर्वात पहिल्यांदा 1983 मध्ये एचआयव्हीचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून जगात जवळपास ८५ दशलक्ष रुग्णांना एचआयव्हीचा संसर्ग झाला असून सुमारे 40 दशलक्ष लोकांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. अद्याप एचआयव्हीवर परिणामकारक व्हॅक्सिन आलेली नव्हती, मात्र सध्या एचआयव्ही व्हॅक्सिनसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच व्हॅक्सिनच्या माध्यमातून एचआयव्ही व्यायरस निष्क्रिय करणाऱ्या एंटीबॉडी निर्माण करण्यात यश आलं आहे.
ड्यूक ह्युमन व्हॅक्सिन इन्स्टिट्यूटच्या संशोधकांना या व्हॅक्सिनची चाचणी करण्यात यश आलं आहे. हे सुरुवातीचं संशोधन आहे, मात्र शास्त्रज्ञ आशावादी आहेत. या संशोधनातून भविष्यात एचआयव्हीपासून शंभर टक्के लोकांचं संरक्षण करणारी लस निर्माण करण्यात मदत होणार आहे.
एचआयव्हीचा व्हायसर सतत बदलत असतो, ज्यामुळे आपल्या शरीराला त्याच्याशी लढणं अवघड होतं. ही नवीन लस विषाणूच्या एका भागाला लक्ष्य करते ज्यामध्ये फारसा बदल होत नाही, त्यामुळे अँटीबॉडीजना HIV चे अनेक प्रकार ओळखण्यास आणि नष्ट करण्यास मदत मिळते.
ड्यूक ह्युमन लस संस्थेचे संचालक आणि ज्येष्ठ लेखक डॉ. बार्टन एफ. हेन्स यांच्या मते, या लसीवरचं संशोधन एक मोठी गोष्ट आहे कारण शरीराला लसीद्वारे एचआयव्हीच्या सर्वात कठीण भागांशी लढण्यासाठी प्रशिक्षित करू शकतात. ही लस अद्याप तयार झालेली नाही, मात्र आपण त्याच्या खूप जवळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ही लस अतिशय जलद आहे! शरीराला काही आठवड्यात एचआयव्ही विरूद्ध विशेष लढाऊ पेशी (अँटीबॉडीज) बनवायला मिळतात, तर नैसर्गिकरित्या एचआयव्ही होण्यासाठी अनेक वर्षे लागतात.