देशात एक लाखावर आयुष्यमान आरोग्य मंदिरे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

देशातील जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देशात एक लाख ३३ हजार आयुष्मान आरोग्य मंदिर स्थापन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

यासंदर्भात ग्रामीण भागातील जनतेला गंभीर आजाराचे निदान करण्यासाठी या आरोग्य मंदिरांचा फायदा होणार असल्याचे सांगून जे. पी. नड्डा म्हणाले, या आरोग्य मंदिरामध्ये प्राथमिक तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आले. या तपासणीत काही गंभीर आजाराची लक्षणे दिसून आल्यास रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येईल, यासंदर्भात काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी उपप्रश्न विचारला होता. 

देशात मानसिक आरोग्य उपचारासाठी ५३ टेली मेंटल सेंटर उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उपचारासंदर्भात माहिती देण्यासाठी अॅप सुरू केले आहे आणि ते २३ भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहे. 

मातामृत्यू दरात घट
गेल्या दहा वर्षात माता मूल्यू दर आणि बालमृत्यू दरात घट झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली. या संदर्भात 'बीजेडी'च्या सुलता देव यांनी उपप्रश्न विचारला होता. जागतिक दराच्या तुलनेत देशात मातामृत्यू दरात ८३ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच बालमृत्यू दरात ७२ टक्के घट झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

मुलांचे सरासरी वजन कमी
एकीकडे आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा केल्याचा दावा केला जात असला तरी देशात अद्यापही एकतृतीयांश मुलांचे वजन कमी आहे. त्याचप्रमाणे ५७ टक्के महिला कुपोषित असल्याचे निदर्शनास आल्याचे काँप्रस्स्चे मुकुल वासनिक यांनी सांगितले असता या संदर्भात जे. पी. नड्डा यांनी आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.

पदव्युत्तर वैद्यकीय जागांमध्ये वाढ
देशात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा आता दौड लाख झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फौजिया खान यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जे. पी. नड्डा यांनी दिली. गेल्या दहा वर्षांत देशात ३०० वैद्यकीय महाविद्यालये व २२ एम्स सुरू झाल्याचेही नड्डा यांनी यावेळी सांगितले.