दिल्लीची हवा आणखी विषारी, AQI 500 वर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राजधानी दिल्ली आणि एनसीआरमधील वायू प्रदूषणामुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI)अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये सर्वात जास्त धोका निर्माण. येथेही मंगळवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमधील मध्ये अनेक ठिकाणी AQI ५०० वर पोहचला. यापूर्वी सोमवारीही AQI पातळी ५०० च्या वर पोहचली होती. त्यामुळे काही शाळा काॅलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी सोमवारी वायू प्रदूषणाबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अडव्हायझरी जारी केली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठाने २३ नोव्हेंबरपर्यंत ऑफलाइन वर्ग आणि नेहरू विद्यापीठाने २२ नोव्हेंबरपर्यंत जवाहरलाल ऑफलाइन वर्ग बंद करून ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय दिल्ली-एनसीआरमधील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आनंद विहार, अशोक विहार, बवाना, जहांगीरपुरी, मेजर ध्यानचंद स्टेडियम आणि इतर अनेक ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक मंगळवारी पहाटे ५ वाजता ५०० च्या वर पोहोचला. आरोग्य आणि सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

दिल्ली सरकारने सोमवारी जाहीर केले की इयत्ता १० आणि १२ चे वर्ग बंद राहतील. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "उद्यापासून, इयत्ता १० आणि १२ चे शारीरिक वर्ग बंद राहतील आणि सर्व वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरु राहतील." शिक्षण संचालनालयाने सरकारी आणि खाजगी शाळांच्या प्रमुखांना १०वी आणि १२वीच्या वर्गांसह सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिवांनीही प्रदूषणाबाबत सल्ला दिला आहे. आपल्या सल्ल्यामध्ये, त्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याचा आणि वायू प्रदूषणाच्या धोक्यांविषयी लोकांना जागरूक करण्याचा सल्ला दिला आहे. वायू प्रदूषणाचा सामना करण्याच्या धोरणांसह हवामान बदलाचे आरोग्यावर होणारे परिणाम दूर करण्यासाठी जिल्हा आणि शहर पातळीवर तपशीलवार कृती योजना विकसित करण्याची सूचनाही या अडव्हायझरीत करण्यात आली आहे.
 
दिल्ली सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
राजधानी दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर तातडीने तोहगा काढण्यात अपयश आल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीमध्ये 'जीआरएपी-४' च्या पर्यावरणविषयक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आहे. आम्हाला विचारल्याशिवाय निर्बंध हटवू नका असेही कोटनि म्हटले आहे. राजधानीतील प्रदूषणाची पातळी ४५० च्या खाली आली तरी हे नवे निर्बंध लागूच राहतील असे कोटनि म्हटले आहे.
 
सर्व नागरिकांना प्रदूषणमुक्त बातावरणात जीवन जगण्याचा अधिकार असून ही स्थिती त्या त्या राज्यांनी उपलब्ध करून देणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य असत्याचे न्या. अभय ओक आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या पीठाने म्हटले आहे. न्यायालयाने इयत्ता बारावीच्या सर्व शिकवण्या या ऑफलाइन घेण्यात यावेत असे सांगितले. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी तीनशे ते चारशेवर जाऊन पोचली आहे. अशा स्थितीमध्ये नवी नियमावली लागू करण्यासाठी विलंब का करत आहात? असा सवाल कोर्टाकडून दिल्ली सरकारला विचारण्यात आला.

वाहतुकीला फटका
देशाच्या राजधानीतील प्रदूषणाचे प्रमाण वाढतच चालले असून शहरातील बहुतांश ठिकाणी वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) पाचशेच्या आसपास पोहोचला आहे. विषारी धूर आणि धुक्यामुळे दिल्ली अक्षरशः गॅस चेंबर बनले आहे. दरम्यान सोमवारी सकाळी दृश्यमानतेचे प्रमाण शून्यावर आले होते. यामुळे असंख्य विमानांचे उड्डाण आणि आगमन लांबले आहे. धुक्याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर देखील झाला आहे.

ट्रकला प्रवेशबंदी महानगरातील नजफगड आणि
द्वारका सेक्टर-८ याठिकाणी एक्यूआय पाचशे इतका नोंदविला गेला. नेहरू नगर येथे हा निर्देशांक ४९९ वर गेला आहे. 'जीआरएपी-४' नुसार दिल्लीत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक वगळता इतर ट्रकना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सीएनजी, एलएनजी, इलेक्ट्रिक आणि बीएस-६ श्रेणीतील ट्रकना मात्र प्रवेशाला परवानगी असेल, ईव्ही, सीएनजी आणि 'बीएस - ६' डिझेल वगळता इतर बसना राजधानीत प्रवेशापासून मनाई करण्यात आली आहे.