कोरोना@५ : समूह प्रतिकारशक्ती आणि लसीकरणामुळे घटला प्रभाव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

मागील वर्षाच्या कटुगोड आठवणींना निरोप देत संपूर्ण जगाने नुकतेच नववर्षांचे जल्लोषात स्वागत केले.  चीनमधील वुहानमधून सबंध जमात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या अभूतपूर्व साथीला या वर्षी पाच पूर्ण होत आहेत. नव्या असलेल्या या विषाणुने काही काळ अख्खे जग ठप्प केले. लाखो जणांचे बळी घेणारा जगाला आर्थिक संकटात लोटणारा कोरोना विषाणू आजही आपल्यासोबत कायम आहे. मात्र, मानवी समूहाची विकसित झालेली प्रतिकारशक्ती, लसीकरण यामुळे त्याचा प्रभाव जाणवत नसून पूर्वषिक्षा तो कमी प्रागभावक झाला आहे. मात्र, विषाणू अजूनही उत्क्रांत होत असल्याने वैज्ञानिकांनी त्याचा बारकाईनि मागोवा घेण्याची गरजही व्यक्त होत आहे.

कोरोना साथीमुळे जगाची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यास लशींनी महत्त्वाची भूमिका बजावली. एका वर्षाच्या आतच अमेरिका व ब्रिटनने फायझर व मॉडर्ना कंपन्यांच्या लशींना मान्यता दिली.
गरीब देशांना लवकर लस मिळू शकली नाही, तरीही २०२१ पासून जगभरात लशीचे १३ अब्जांपेक्षा अधिक डोस दिल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. 

या लशी परिपूर्ण नसल्या तरी गंभीर स्थितिपासून रुग्णालयात दाखल होणे रोखण्यापासून मृत्यू कमी करण्यामध्ये लशींनी मोलाचे योगदान दिले. कोरोनाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन लशीही अद्ययावत करण्यात आल्या, तसेच नाकावाटे देण्याची लसही उपलब्ध झाली, कोरोना विषाणुत जनुकीय बदल होत गेले. शास्त्रज्ञांनी विषाणुच्या प्रकारांना अल्पध, बोटा, गंमा, डेल्टा आणि ओमिक्रान अशी
नावे दिली. मात्र, मूळ विषाणुइतके नुकसान त्याच्या पुढील प्रकारांनी केले नाही. संशोधक याचे श्रेय समूह प्रतिकारशक्ती आणि लसीकरणाला देतात.

लाँग कोव्हिडचे परिणाम
कोरोना संसर्गानंतर लाखो लोकांना लाँग कोव्हिडच्या माध्यमातून दीर्घकाळ टिकणारे अदृश्य परिणाम भोगावे लागले. अनेकांना कमालीचा थकवा, संज्ञानात्मक समस्या, हृदय व रक्तवाहिन्यासंदर्भातील अनेक महिने किंवा वर्षानुवर्ष टिकणाऱ्या लक्षणांचा सामना करावा लागत आहे.

नेमके किती जणांचे मृत्यू ?
कोरोनाच्या प्रसाराप्रमाणेच वा विषाणुमुळे नेमके किती जणांचे मृत्यू झाले, याबाबतही  वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जगभरात कोरोनामुळे दोन कोटीपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार सदस्य देशांत ७० लाखांपेक्षा अधिकांनी जीव गमावला. प्रत्यक्षात यापेक्षा तिप्पट मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 

अमेरिकेत गेल्या वर्षीही आठवड्याला ९०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅड प्रिव्हेन्शनची आकडेवारी सांगते. देशात रुग्णालयात दाखल केलेल्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण ७५ वर्षापुढील होते. कोरोना विषाणू अजूनही आपल्यासोबत असल्याने आपण भूतकाळावर अधिक बोलू शकत नाही, ही जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस घेब्रेवेसूम यांची प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते.

विषाणू आला कोठून ?
वटवाघळांमध्ये असणा-या कोरोनाच्या इतर विषाणूंप्रमाणे हा विषाणू प्रथम रकून प्रजातीचे कुत्रे, सिव्हेट प्रजातीच्या मांजरी, उंदरांमध्ये पसरला. त्यानंतर चीनमधील वुहान येथील मार्केटमध्ये प्राण्यांना हाताळताना किंवा त्यांची कत्तल करताना या विषाणुचा मनुष्याला सर्वप्रथम संसर्ग झाल्याचे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. 

वुहानमध्ये नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वप्रथम कोरोना संसर्ग झालेला पहिला रुगण आढळला. वुहानमध्ये अनेक प्रयोगशाळा असून कोरोनासह अन्य विषाणूंवर येथे अभ्यास केला जात असल्याने पा ठिकाणाहूनच कोरोना पसरल्याचे मानले जाते. मात्र, विषाणुभोवतीचे राजकारण आणि चीनने पुरावे मिळू न देण्यासाठी प्रयत्न केल्याने कोरोनाच्या उगमाचे कोडे अनेक वर्षे कायम राहू शकते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter