Artificial Intelligence मध्ये अंबानी यांची एन्ट्री

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 Months ago
मुकेश अंबानी
मुकेश अंबानी

 

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीचं नेतृत्व मुकेश अंबानी यांनी केलं. या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला सुरुवात होताच या कंपनीच्या शेअर्सने शेअर बाजारात रॉकेटचा वेग घेतला. त्यानंतर शेअर बाजारात शेअर्सने जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. या बैठकीत मुकेश अंबानी यांनी कंपनीत रोजगाराच्या संधी वाढवण्यावर असल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी मागील वर्षी १.७ लाख नव्या रोजगार संधी उपलब्ध केल्याचे सांगितले.

मुकेश अंबानी यांनी बैठकीत केल्या मोठ्या घोषणा
AI वर लक्ष्य - रिलायन्सने सर्व व्यवसायांसाठी एक AI नेटिव्ह डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे.

जियोब्रेन - जिओ एआय प्लॅटफॉर्म वापरण्याचा वेग वाढवण्यावर भर देणार आहे.

जियो AI-क्लाउड वेलकम ऑफर - युजर्सला १०० जीबीपर्यंत फ्री क्लाऊड स्टोरेज मिळणार आहे.

जिओ टीव्हीओएस - एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम जिओ सेट-टॉप बॉक्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे.

जिओ फोनकॉल एआय - कॉल रेकॉर्डिंग, ट्रांसक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन सारख्या सुविधा मिळणार आहे.

जिओचे ४९० मिलियन युजर्स - जिओ आता भारताचा सर्वात मोठा डेटा बाजार आहे.

जिओ ट्रू ५ जी - भारत सर्वात वेगवान ५ जी स्वीकारणारा नेटवर्क

सर्वांसाठी एआय - अंबानींचं म्हणणं आहे की, आता एआयची सुविधा सर्वांना वापरता आली पाहिजे. फक्त प्रीमियम डिव्हाइससाठी नव्हे.

अंबानींनी जिओच्या एआय-क्लाऊड वेलकम ऑफरची घोषणा केली आहे. आता जिओ युजर्सला १०० जीबीपर्यंत फ्री क्लॉउड स्टोरेज मिळणार आहे. त्यात फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेट्स आणि अन्य डिजिटल कंटेट आणि डेटा सुरक्षित राहू शकतो. तसेच वापरता येणार आहे.

रिलायन्सच्या जिओ टीव्हओएस आणि जिओ होम अॅपने होम एंटरटेंनमेंटमध्ये पाऊल ठेवण्याची घोषणा केली आहे. जिओ टीव्हीओएस जिओ सेट-टॉप बॉक्ससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम डिझाइन केली आहे. त्याचबरोबर जिओ फॉन कॉल एआय देखील तयार आहे. या सुविधेत फॉन कॉलमध्ये एआयचा वापर सहजरित्या होणार आहे. तसेच त्यात जिओ क्लाऊड आणि कॉल रेकॉर्ड जतन करता येणार आहेत. दरम्यान, यावेळी अंबानींनी शेअरच्या गुंतवणूकदारांनाही मोठी घोषणा केली. कंपनीने एका शेअरवर एक बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे.